
- तीन दिवसीय आयोजन; पैठणी, साड्यांचे नानाविध प्रकार उपलब्ध राहणार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : पैठणीचा लौकिक जगभर पोहचवणाऱ्या येवला आणि नाशिकस्थित सोनी पैठणीच्या वतीने डोंबिवली येथे भव्य पैठणी महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती संचालक संजय सोनी यांनी दिली.
येत्या २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान हा महोत्सव घेण्यात येणार आहे. यामध्ये डोंबिवलीकरांना प्युअर, टिश्यू, कॉटन, सेमी इरकल कलमकारी या पैठणी प्रकारांसोबतच कांजीवरम, गढवाल, चंदेरी, माहेश्वरी, बनारसी, लिनन, सॉफ्ट सिल्क, लिनन हे साडी प्रकार उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय, पैठणी लहंगे, जाकीट, ड्रेस मटेरीअल, शाली, पर्स हे कलेक्शन देखील खरेदिण्याची संधी राहणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सुरु राहणाऱ्या या महात्सावास भेट देण्याचे आवाहन सोनी यांनी केले आहे.
Comments are closed.