
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
ग्रो अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड (ग्रो एएमसी) ने आज नाशिकमध्ये आपल्या नवीन शाखेच्या उद्घाटनाची घोषणा केली. या शाखेमुळे भारतभरातील कंपनीची प्रत्यक्ष उपस्थिती अधिक बळकट होणार आहे. या शाखेचे उद्घाटन विभागीय प्रमुख (पश्चिम) कृष्ण मोहन गुप्ता आणि फंड मॅनेजर सप्तर्षी चॅटर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाला नाशिक आणि आसपासच्या परिसरातील प्रमुख वितरण भागीदार उपस्थित होते.
नाशिकमधील ही शाखा ग्रो एएमसीच्या विस्तारत असलेल्या कार्यालयीन नेटवर्कमधील नवीन भर आहे. भागीदारांना केंद्रस्थानी ठेवून काम करणारा ब्रँड म्हणून आपली ओळख अधिक दृढ करण्यावर कंपनीचा सातत्यपूर्ण भर असल्याचे यातून दिसून येते. या कार्यालयाच्या माध्यमातून परिसरातील वितरण भागीदारांना विपणन साहित्य, कामकाजासाठी आवश्यक सहाय्य आणि समर्पित रिलेशनशिप मॅनेजर्सची सेवा उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे त्यांना आपल्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा देता येईल.
ग्रो अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे विभागीय प्रमुख (पश्चिम) कृष्ण मोहन गुप्ता म्हणाले, “आमच्या सर्व कामकाजाच्या केंद्रस्थानी आमचे वितरण भागीदार आहेत. त्यांच्याशी अधिक जवळून काम केल्यामुळे आमच्या परस्पर सहकार्यामध्ये खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल झाला आहे. नाशिकमध्ये म्युच्युअल फंड वितरकांचा सक्रिय समुदाय आहे. ही शाखा आम्हाला अधिक जलद सहाय्य पुरवण्यास आणि शहरात तसेच आसपासच्या परिसरात कार्यरत असलेल्या भागीदारांशी अधिक दृढ संबंध निर्माण करण्यास मदत करेल. पश्चिम भारतातील आमची उपस्थिती वाढवत असताना आमच्या एमएफडी (म्युच्युअल फंड वितरक) भागीदारांच्या प्रगतीसाठी एक विश्वासार्ह सहकारी बनणे हे आमचे उद्दिष्ट आजही तेच आहे.”
नाशिकमधील ग्रो एएमसीची शाखा पुढील पत्त्यावर स्थित आहे: ग्रो म्युच्युअल फंड, 405-406, चौथा मजला, श्री गणेश व्हिस्टा, साधू वासवानी रोड, कुलकर्णी कॉलनी, जेजुरकर वाडी, शरणपूर, नाशिक, महाराष्ट्र – 422002. हे कार्यालय सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील.
वितरण भागीदारांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक संसाधने आणि सहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रो एएमसी देशभरातील आपल्या कार्यालयीन नेटवर्कचा विस्तार सुरू ठेवणार आहे.
Comments are closed.