NGN News
Latest Marathi News

बजाज फायनान्स लि. कडून मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ

  • ७ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणाऱ्या १२ ते ६० महिन्यांच्या सर्व कालावधींवरील एफडी दरांमध्ये १५ ते ४० बेसिस पॉईंट्सने वाढ करण्यात आली आहे.
  • नियमित ठेवीदारांना (नवीन ठेवी) वर्षाला ७.७५% पर्यंत व्याज मिळू शकते; ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला ८.१५% पर्यंत व्याज मिळू शकते.

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी बजाज फायनान्स लि. ने आज १२ ते ६० महिन्यांच्या सर्व कालावधींवरील आपल्या मुदत ठेवींवरील (फिक्स्ड डिपॉझिट) व्याजदरांमध्ये १५ ते ४० बेसिस पॉईंट्सने वाढ केली आहे. सुधारित दर आजपासून लागू होत असून ते नवीन ठेवी आणि नूतनीकरण (रिन्यूअल) दोन्हीसाठी लागू असतील. सर्वाधिक वाढ दीर्घ कालावधीच्या ठेवींवर करण्यात आली आहे. ३१ ते ६० महिन्यांच्या कालावधीसाठी नियमित ठेवीदारांसाठी व्याजदरात ३५ बेसिस पॉईंट्स आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ४० बेसिस पॉईंट्सने वाढ झाली आहे.

नवीन ठेव ठेवणाऱ्या नियमित ठेवीदारांना आता ३१ ते ६० महिन्यांच्या कालावधीसाठी संचयी (क्युम्युलेटिव्ह) तत्त्वावर प्रतिवर्ष ७.७५% पर्यंत व्याज मिळू शकते, जे आधी ७.४०% प्रतिवर्ष होते. १२ ते १७ महिन्यांच्या ठेवींवरील दर ६.६०% वरून ६.८०% प्रतिवर्ष आणि १८ ते ३० महिन्यांच्या ठेवींवरील दर ६.८५% वरून ७.००% प्रतिवर्ष झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना आता सर्व कालावधींमध्ये नियमित दरांपेक्षा अतिरिक्त ०.४०% प्रतिवर्ष व्याज मिळेल, जे आधी ०.३५% होते. ज्येष्ठ नागरिकांच्या नवीन ठेवींवर ३१ ते ६० महिन्यांसाठी वर्षाला ८.१५% पर्यंत व्याज मिळेल, जे आधी ७.७५% प्रतिवर्ष होते. १२ ते १७ महिन्यांसाठी आता दर ७.२०% प्रतिवर्ष आणि १८ ते ३० महिन्यांसाठी दर ७.४०% प्रतिवर्ष झाला आहे.

नूतनीकरणावर (रिन्यूअल) अतिरिक्त फायदा
मुदत पूर्ण होणारी ठेव रिन्यू करणाऱ्या ठेवीदारांना अतिरिक्त ०.१०% प्रतिवर्ष व्याज मिळेल. यामुळे नियमित ठेवीदारांसाठी व्याजदर ७.८५% प्रतिवर्ष आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ८.२५% प्रतिवर्ष होईल, जो सुधारित रचनेतील सर्वोच्च दर आहे. ठेवीदार मुदतपूर्तीनंतर (मॅच्युरिटी) व्याज मिळणारा संचयी (क्युम्युलेटिव्ह) पर्याय निवडू शकतात, किंवा मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर व्याज मिळणारा बिगर-संचयी (नॉन-क्युम्युलेटिव्ह) पर्याय निवडू शकतात. बिगर-संचयी दर त्यानुसार सुधारित केले गेले आहेत. उदाहरणार्थ, ३१ ते ६० महिन्यांच्या ठेवीवर मासिक व्याजाचा पर्याय निवडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला आता ७.४९% प्रतिवर्ष ऐवजी ७.८६% प्रतिवर्ष व्याज मिळेल.

बजाज फायनान्सचे सिनियर एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट – डिपॉझिट्स अँड वेल्थ मॅनेजमेंट, सचिन सिक्का म्हणाले, “संतुलित बचत पोर्टफोलिओमध्ये मुदत ठेवींचे (फिक्स्ड डिपॉझिट) महत्त्व कायम आहे, विशेषतः अंदाज बांधता येणारा परतावा शोधणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी.
आम्ही व्याजदरवाढ दीर्घ मुदतीच्या ठेवींकडे अधिक झुकवली आहे, जेणेकरून ठेवीदार AAA- रेटेड ठेवीवर पाच वर्षांपर्यंत उच्च परतावा निश्चित करू शकतील, जी ते काही मिनिटांत ऑनलाईन सुरू करू शकतात. रिन्यूअलवरील अतिरिक्त लाभ हा आमच्यावर सातत्याने विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकांचे आभार मानण्याचा आमचा मार्ग आहे.”

ग्राहक बजाज फायनान्सची वेबसाईट आणि अ‍ॅपद्वारे किंवा कंपनीच्या शाखा आणि भागीदार चॅनेलद्वारे ऑनलाईन ठेव ठेवू शकतात किंवा रिन्यू करू शकतात. बजाज समूहाचा शतकभराचा वारसा, कोट्यवधी ग्राहकांचा विश्वास आणि AAA-रेटेड मुदत ठेवींच्या पाठबळासह, बजाज फायनान्स ग्राहकांना स्थैर्य, स्पर्धात्मक परतावा आणि सुरक्षिततेचा उत्तम संगम प्रदान करते.

बजाज फायनान्स मुदत ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) का निवडावी?

बजाज फायनान्सच्या मुदत ठेव प्रोग्रामला CRISIL कडून AAA/Stable आणि ICRA कडून AAA/Stable रेटिंग मिळाले आहे, जे आर्थिक दायित्वांची वेळेवर पूर्तता करण्यासाठी सर्वोच्च सुरक्षेचे संकेत देते. गुंतवणूकदार किमान रु. १५,००० पासून सुरुवात करू शकतात, क्युम्युलेटिव्ह किंवा नॉन-क्युम्युलेटिव्ह (मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक) परतावा निवडू शकतात आणि पूर्णपणे डिजिटल, कागदपत्ररहित प्रक्रियेद्वारे गुंतवणूक करू शकतात. एफडीवरील कर्ज सुविधा (Loan-against-FD) मुदतपूर्तीपूर्वी ठेव न मोडता लिक्विडिटीची (रोख रक्कम) सोय उपलब्ध करून देते.

बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल ..
बजाज फिनसर्व्ह लि. ची उपकंपनी असलेली बजाज फायनान्स लि. (‘BFL’, ‘बजाज फायनान्स’ किंवा ‘कंपनी’) ही भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) नोंदणीकृत ठेव स्वीकारणारी बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC-D) आहे आणि तिचे वर्गीकरण एनबीएफसी-इन्व्हेस्टमेंट अँड क्रेडिट कंपनी (NBFC-ICC) म्हणून करण्यात आले आहे. BFL ही कर्ज देणे आणि ठेवी स्वीकारण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. शहरी आणि ग्रामीण भारतात लक्षणीय उपस्थितीसह किरकोळ (रिटेल), लघु व मध्यम उद्योग (SMEs) आणि व्यावसायिक ग्राहकांमध्ये तिचा वैविध्यपूर्ण कर्ज पोर्टफोलिओ आहे. ती सार्वजनिक आणि कॉर्पोरेट ठेवी स्वीकारते आणि आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या वित्तीय सेवा उत्पादने पुरवते. ३७ वर्षांचा इतिहास असलेली BFL आता एकत्रित (कॉन्सोलिडेटेड) आधारावर भारतातील एनबीएफसी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बनली आहे. सप्टेंबर २०२६ पर्यंत १२.८ कोटींपेक्षा (128 million) अधिक ग्राहक कंपनीशी जोडले गेले आहेत. BFL ची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) रु. ५,८४,७५० कोटी आहे. BFL कडे दीर्घकालीन कर्जासाठी AAA/Stable, अल्पकालीन कर्जासाठी A1+, आणि तिच्या एफडी प्रोग्रामसाठी CRISIL AAA/Stable व ICRA AAA/Stable ही सर्वोच्च अंतर्गत क्रेडिट रेटिंग्स आहेत. कंपनीला S&P ग्लोबल रेटिंग्सकडून BBB/Stable चे दीर्घकालीन इश्युअर क्रेडिट रेटिंग आणि A-2 चे अल्पकालीन क्रेडिट रेटिंग मिळाले आहे.

Comments are closed.