NGN News
Latest Marathi News

NDIC- IIT यांच्यात मास्टर रिसर्च करार; संरक्षण तंत्रज्ञान संशोधनाला नवी दिशा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी तंत्रज्ञान विकास, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी नाशिक डिफेन्स इनोव्हेशन सेंटर (NDIC) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (IIT Bombay) येथील Centre for Defence Technology Innovations and Strategies (CDTIS) यांच्यात आज मास्टर रिसर्च अ‍ॅग्रीमेंट करण्यात आला. IIT बॉम्बे येथे झालेल्या या करारामुळे संरक्षण क्षेत्रातील संशोधन, तंत्रज्ञान विकास, स्वदेशीकरण तसेच उद्योग आणि अकादमी यांच्यातील सहकार्याला अधिक बळ मिळणार आहे.


या करारांतर्गत संरक्षण क्षेत्रातील विविध तांत्रिक गरजांवर वैज्ञानिक संशोधन, स्वदेशी उत्पादने व तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांचा विकास, अल्गोरिदम डिझाइन व व्हॅलिडेशन, सिस्टम आर्किटेक्चर व इंटिग्रेशन तसेच सिम्युलेटेड आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय वातावरणात तंत्रज्ञानाची चाचणी व मूल्यमापन करण्यात येणार आहे. याशिवाय, दोन्ही संस्थांच्या परस्पर संमतीने निश्चित होणाऱ्या अन्य क्षेत्रांमध्येही संयुक्तपणे काम केले जाणार आहे.

या महत्त्वपूर्ण करारावेळी IIT बॉम्बेचे Dean R&D प्रा. श्रीकृष्ण व्ही. कुलकर्णी, CDTIS चे Professor-in-Charge प्रा. मकरंद कुलकर्णी, तसेच NDICचे संचालक प्रदीप पेशकार, प्रशांत पाटील आणि युवराज वडजे उपस्थित होते. NDICचे कार्यकारी अधिकारी गौरव आहेर यांचीही यावेळी उपस्थिती होती. या सहकार्यामुळे MSMEs, स्टार्टअप्स, नवोन्मेषक, संरक्षण उद्योग आणि संशोधन संस्थांना IIT बॉम्बेच्या संशोधन व तांत्रिक क्षमतांशी जोडण्यासाठी NDICला प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. संरक्षण क्षेत्रातील गरजा आणि उपलब्ध संशोधन क्षमता यांच्यातील दरी कमी करून स्वदेशी तंत्रज्ञान विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Comments are closed.