NGN News
Latest Marathi News

आदित्य बिर्ला ज्वेलरी ब्रँड इंद्रियाकडून नाशकात पहिले स्टोअर सुरू

  • नवीन इंद्रिया स्टोअरमध्‍ये वधू, सण-उत्सव, समकालीन आणि रोजच्या वापराच्या कलेक्शनमधील ३२,००० हून अधिक दागिन्यांचे डिझाइन्स उपलब्ध

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

आदित्य बिर्ला ज्वेलरी ब्रँड इंद्रियाने नाशिकमध्ये आपले पहिले स्टोअर सुरू करून महाराष्ट्रातील उपस्थिती अधिक दृढ केली आहे. या नव्या स्टोअरसह ब्रँडने राज्यातील सोळाव्या स्टोअरचा टप्पा गाठला आहे. यामुळे दागिन्यांची विशेष आवड असलेल्या, सण-उत्सवांच्या खरेदीला प्राधान्य देणाऱ्या आणि डिझाइन-आधारित रिटेल अनुभवांकडे आकर्षित होणाऱ्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करण्याचे ब्रँडचे धोरण अधिक स्पष्ट झाले आहे.

शहरातील प्रमुख व्यावसायिक केंद्र असलेल्या शरणपूर रोड येथे हे स्टोअर मोक्याच्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. हे स्टोअर ग्राहकांना दागिन्यांचा विलोभनीय आणि ग्राहक-केंद्रित अनुभव मिळावा यासाठी अत्यंत विचारपूर्वक डिझाइन करण्यात आले आहे. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेल्या नाशिक शहराचे दागिन्यांशी असलेले नाते अत्यंत जुने आणि अतूट आहे, जे येथील दैनंदिन जीवन, लग्नपरंपरा आणि सण-उत्सवांमध्ये प्रकर्षाने दिसून येते. नथ, ठुशी आणि कोल्हापुरी साज यांसारख्या पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांपासून ते धार्मिक सण आणि समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या दागिन्यांपर्यंत नाशिकच्या सांस्कृतिक जडणघडणीत दागिन्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच, नाशिकमधील ग्राहकांच्या आवडीनिवडींमध्ये देखील बदल होत असून वजनाने हलके डिझाइन्स, आधुनिक हिऱ्यांची आणि रोजच्या वापरासाठी योग्य असणाऱ्या बहुविध दागिन्यांकडे त्यांचा कल वाढत आहे. हा बदल आणि शहराचे वाढते नागरीकरण पाहता कलाकुसरीची कदर आणि नवनवीन डिझाइन-आधारित खरेदीची वाढती मागणी यांचा मेळ घालणारी आश्वासक बाजारपेठ म्हणून नाशिक शहर समोर आले आहे.

३२,००० हून अधिक डिझाइन्सच्या व्‍यापक कलेक्शन्ससह हे स्टोअर वधूचे दागिने, सण-उत्सवांचे कलेक्शन, मॉडर्न स्टेटमेंट पीसेस आणि रोजच्या वापरासाठीचे वजनाने हलके दागिने अशा ग्राहकांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करते. इंद्रियाचे डिझाइनला प्रथम प्राधान्य देण्याचे तत्त्वज्ञान अधोरेखित करत हे स्टोअर पारंपरिक कारागिरी आणि आधुनिक सौंदर्यशास्त्र यांचा सुरेख संगम घडवून आणते. तसेच, स्टोअरमधील कारागिरी रूम सारख्या खास जागा व्यक्ती व कुटुंबीयांना खरेदीचा आगळावेगळा आणि संस्मरणीय अनुभव देतात.

या नव्या स्टोअरच्या लाँचसह इंद्रियाने पश्चिम भारतात आपली उपस्थिती अधिक दृढ केली आहे, जिथे दागिन्यांचा व्‍यापक पोर्टफोलिओ आणि वैशिष्ट्यपूर्ण इन-स्टोअर अनुभव शहरामधील ग्राहकांच्या जवळ आणला आहे.

या प्रसंगी मत व्‍यक्त करतइंद्रियाचे सीईओ श्री. संदीप कोहली म्हणाले, “नाशिक हे इंद्रियाच्या प्रगतीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे, कारण आम्ही आमचे कलेक्शन पहिल्यांदाच या शहरात आणत आहोत. दागिन्यांबद्दलच्या अत्यंत आदरासाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये सध्या ग्राहकांच्या आवडीनिवडींमध्ये बदल पाहायला मिळत आहे, ते म्हणजे लग्न आणि सण-उत्सवांसारख्या पारंपरिक प्रसंगांसोबत आता रोजच्या वापरासाठी योग्य, आधुनिक आणि बहुविध डिझाइन्सकडे त्यांचा कल वाढत आहे. ग्राहकांची ही बदलती मानसिकता आधुनिक डिझाइन आणि उत्कृष्ट कलाकुसरीचा मेळ घालण्याच्या इंद्रियाच्या तत्त्वज्ञानाशी तंतोतंत जुळणारी आहे. शहरातील आमच्या पहिल्या स्टोअरच्या माध्यमातून आम्ही आदित्य बिर्ला ग्रुपच्या विश्वासासह दागिन्यांचा अधिक दर्जेदार आणि विलोभनीय अनुभव ग्राहकांना देण्यास उत्सुक आहोत.”

इंद्रिया संपूर्ण भारतात आपल्या रिटेल नेटवर्कचा विस्तार करत असताना विचारपूर्वक तयार केलेल्या जागा, आधुनिक कारागिरी आणि दागिन्यांच्या उत्कृष्ट अनुभवांच्या माध्यमातून ग्राहकांशी अर्थपूर्ण नाते जोडण्याच्या ब्रँडच्या दृष्टिकोनात महाराष्ट्र हे नेहमी केंद्रस्थानी राहिले आहे. नाशिकमधील हे नवीन स्टोअर प्रत्येक खरेदीमध्ये डिझाइन, भावना आणि स्वतःची स्वतंत्र ओळख शोधणाऱ्या भारतातील आधुनिक ग्राहकांसाठी हक्‍काचे ज्वेलरी डेस्टिनेशन बनण्याच्या इंद्रियाच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.

Comments are closed.