NGN News
Latest Marathi News

तनाएराचे नवे ‘इनाया’ आधुनिक साड्यांचे कलेक्शन

  • फक्त ३४९९ रुपयांपासून पुढील किमतींना, वजनाला हलक्या, मोहक साड्यांचे कलेक्शन

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

सण-उत्सव आणि कौटुंबिक सोहळ्यांचे स्वरूप आता अधिक वैयक्तिक, मनातील भावना व्यक्त करण्याला प्रोत्साहन देणारे आणि स्टाईलबद्दल जागरूक होत चालले आहे. हाच बदलता ट्रेंड लक्षात घेऊन, टाटा समूहाचा ब्रँड तनाएराने ‘इनाया’ हे आधुनिक साड्यांचे कलेक्शन सादर केले आहे. सहज, सुंदर, अष्टपैलू आणि उत्सव मनापासून साजरे करणाऱ्या आजच्या आधुनिक भारतीय महिलेला केंद्रस्थानी ठेवून हे कलेक्शन डिझाईन केले आहे. अवघ्या ३,४९९ रुपये पासून सुरू होणारे हे कलेक्शन उत्कृष्ट डिझाईन, आधुनिक आकर्षण आणि आत्मविश्वास यांनी परिपूर्ण अशी एक स्वतंत्र ओळख मिळवून देते; ज्यामुळे ग्राहकांना विशेष प्रसंगी करण्याच्या फॅशनचा बजेट-फ्रेंडली आणि तरीही आलिशान अनुभव मिळतो. इनायामध्ये तुम्हाला मिळेल, आधुनिक ढंगाच्या, वजनाने अत्यंत हलक्या आणि अंगावर छान घोळदार बसणाऱ्या साड्या! हे कलेक्शन तुम्हाला देते, कमालीचा आराम आणि आकर्षक रूप यांचा सुरेख संगम. घरगुती छोटे कार्यक्रम आणि आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे साजरे करण्यापासून ते लग्नाआधीचे विधी आणि उच्चभ्रू सामाजिक सोहळ्यांपर्यंत, प्रत्येक प्रसंगाची शोभा वाढवण्यासाठी हे कलेक्शन उत्तम आहे.

निसर्गाची लय आणि विश्वाची अनंत गती, जिथे प्रत्येक गोष्ट निरंतर, देखण्या स्थित्यंतरातून जात असते — या कल्पनेतून प्रेरित होऊन हे कलेक्शन साकारले गेले आहे. अमूर्त फुलांचे नक्षीकाम, नव्याने निर्माण होत जाणारे आकार आणि खगोलीय भूमितीय प्रभाव या साड्यांमधून जिवंत होऊन उठतात. पहाटेची कोमलता, सांजवेळेची समृद्धी आणि बहरलेली फुले अशा निसर्गाच्या बदलत्या रूपांपासून प्रेरित असलेली रंगसंगती या कलेक्शनला अधिक सखोलता आणि आपलेपणा प्रदान करते.

या लाँच प्रसंगी बोलताना तनाएराचे सीएसएमओश्री. सोमप्रभ कुमार सिंग म्हणाले, विशेष प्रसंगी नेसल्या जाणाऱ्या साड्या हा आमच्या ब्रँडचा अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहेज्याचा आमच्या एकूण विक्रीमध्ये वाटा जवळपास ६० ते ७०% आहे. आजच्या महिला सण-उत्सवांसाठी पेहराव करताना स्व-अभिव्यक्तीला आणि स्वतःची स्वतंत्र ओळख जपण्याला विशेष महत्त्व देतात. प्रत्येक सोहळ्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू दिसावाअशी त्यांची इच्छा असते. ‘नेव्हर लुक द सेम’ (कधीही एक सारखे दिसू नका) या विचारसरणीवर आधारित, ‘इनाया‘ हे कलेक्शन महिलांच्या याच बदलत्या मानसिकतेला पूरक आहे. इनाया‘ मध्ये अष्टपैलूतुम्हाला व्यक्त करणाऱ्या आणि सहजसुंदर अशा आधुनिक साड्यांचा समावेश आहे. सहज परवडण्याजोग्या या कलेक्शनच्या माध्यमातून आम्हाला समारंभांना वापरता येतील अशा साड्या तयार करायच्या होत्याआमचा उद्देश आहे या साड्यांनी महिलांना त्यांच्या सेलिब्रेशन स्टाईलमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची संधी द्यावी आणि प्रत्येक क्षण एका नव्या आत्मविश्वासाने व स्व-अभिव्यक्तीने साजरा करण्यास प्रेरित करावे.”

यंदाच्या लग्नसराईमध्ये तनाएराचा ओकेजन वेअर पोर्टफोलिओ (विशेष प्रसंगी वापरावयाच्या कपड्यांचे कलेक्शन) अधिक शानदार आणि भव्य करत आहेत दोन विशेष कलेक्शन्स — ‘द व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ आणि ‘रास’! ही दोन्ही कलेक्शन्स कला, संस्कृती आणि आधुनिक डिझाईन यांचा सुरेख मिलाप असलेल्या, सण-उत्सवांच्या पेहरावाचे वेगवेगळे पैलू सादर करतात. ‘द व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ कलेक्शन हे बहरलेल्या आल्प्स पर्वताच्या निसर्गचित्रांपासून आणि फुलांवरील गुंतागुंतीच्या कलाकुसरीपासून प्रेरित आहे; लग्नकार्ये आणि उत्सवांसाठी खास तयार केलेल्या या देखण्या साड्यांमध्ये प्रणय, रंग आणि चैतन्य यांचे सुंदर मिश्रण घडवून आणले आहे.

तनाएराची ही सर्व कलेक्शन्स सण-उत्सवांमध्ये वापरावयाच्या कपड्यांचा असा एक शानदार खजिना तयार करतात जो मनमोहक आहे, तसेच जुन्या आठवणींना उजाळा देतो. ब्रँडने ग्राहकांना विशेष आमंत्रण दिले आहे की त्यांनी आपल्या जवळच्या तनाएरा स्टोरला भेट देऊन ही कलेक्शन्स प्रत्यक्ष अनुभवावीत. www.taneira.com या वेबसाईटवर ऑनलाईन देखील ती पाहता येतील.

Comments are closed.