NGN News
Latest Marathi News

तरुणांना पट्ट्याने मारहाण; परस्परांशी लैंगिक चाळे करायला भाग पाडले..

  • जळगावच्या चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात निंदाजनक प्रकार
  • संबंधित पोलिस उपनिरीक्षक निलंबित

जळगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क

अल्पवयीन मुलीच्या अपहरणावरुन तक्रारदारांच्या आरोपावरुन संयशित म्हणून पकडलेल्या भिल्ल समाजाच्या तरुणांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करुन त्यांना परस्परांशी लैंगिक चाळे करायला लावण्याचा निंदाजनक प्रकार जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात घडला आहे. या प्रकरणात बहुजन समाज पार्टीने तक्रार केल्यानंतर संबंधित पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. सज्जनसिंह नार्हेडा असे या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे. या प्रकाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे,

प्राप्त माहितीनुसार, एका गुन्ह्याप्रकरणात भिल्ल समाजाच्या तीन तरुणांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना अमानुषपणे मारहाण करून अंगावरचे कपडे काढून नग्न व्हायला सांगण्यात आले. त्यानंतर परस्परांशी लैंगिक चाळे करण्यास भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात घडला. या घृणास्पद प्रकारामागे पोलीस उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडा हे असल्याचा जाहीर आरोप करण्यात आला. एकलव्य संघटनेने तशी तक्रार केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करुन त्याची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत दोषी निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली

Comments are closed.