NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

गोमांस तस्करी संशयावरुन युवक हत्या प्रकरणी ११ संशयितांना बेड्या

0

 इगतपुरी/एनजीएन नेटवर्क

गोमांस तस्करीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत गेल्या शनिवारी युवकाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी ११ संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. सोमवारी त्यांना इगतपुरी न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

इगतपुरी तालुक्यातील घोटी-सिन्नर मार्गावरील गंभीरवाडीजवळ शनिवारी सायंकाळी गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून कार अडविण्यात आली. कारमधील दोन जणांना १० ते १५ जणांनी गज आणि दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत अफान अन्सारी (३२) याचा मृत्यू झाला. तर, नासिर हुसेन कुरेशी (२४) हा गंभीर जखमी झाला. त्याला धामणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही मुंबईतील कुर्ला (पूर्व) येथील कुरेशी नगरातील रहिवासी आहेत. ताब्यात घेतलेले संशयित इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील रहिवासी आहेत. संशयितांना सोमवारी न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Leave A Reply

Your email address will not be published.