NGN News
Latest Marathi News

मैत्रिणीची छेड काढणे अंगलट; नाशकात युवकाचा भरदिवसा खून

डोक्यात पेव्हर ब्लॉक घातला; तीन अल्पवयीन युवकांकडून कृत्य

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

मैत्रिणीची छेड काढल्याच्या रागातून तीन अल्पवयीन युवकांनी एका तरुणाच्या डोक्यात सिमेंट पेव्हर ब्लॉक घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ( दि. २ ) शहरात घडली. गजबजलेल्या ठक्कर बझार परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकाराने खळबळ माजली आहे. या प्रकरणातील तीनही अल्पवयीन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत तरुणाची ओळख पटली नसून पोलीस खुनामागील कारणाचा कसून तपास करीत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. मृत तरुण आणि तीनही संशयित तरुण यांच्यात मैत्रिणीच्या छेडछाडीतून वाद सुरु झाला. त्याचे रुपांतर बाचाबाचीत झाल्यानंतर तीन तरुणांनी त्या तरुणाच्या डोक्यात सिमेंट पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून निर्घृण खून केला. या तिघांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत ताब्यात घेतले.

Comments are closed.