त्र्यंबकेश्वर/रवींद्र धारणे
जंनेरी, ब्रह्मगिरी पर्वत शिखरां वरुन असंख्य धबधबे कोसळतात. त्यामुळे हे धबधबे सुरु झाले की असंख्य पर्यटकांची पावले आपोआप इकडे वळतात. अशातच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक अमित शर्मा (१७) वाहून गेल्याची घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी (दि. १६) रोजी अनेक पर्यटक दुगारवाडी धबधबा तसेच आजूबाजूच्या परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येथे आले होते. दरम्यान काल दुपारी चार वाजेच्या सुमारास सह्याद्री नगर, लाॅरेन्स रोड, देवळाली कॅम्प येथील रहिवाशी अमित शर्मा हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती समजताच वनविभागासह पोलिस शोधमोहीम राबवत आहे. आज सकाळी पहाटे पाच वाजेपासून शोधमोहीम पुन्हा सुरू केली आहे. नदीला पाणी जास्त असल्याने शोधकार्यास अडथळा येत आहे.