नाशिक/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी महिला नाशिक शहराध्यक्षपदी ( अजित पवार गट) ज्येष्ठ उद्योजिका तथा ‘आयमा’च्या पदाधिकारी योगिता आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सदर नियुक्तीचे पत्र आहेर यांना पाठवले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अभिप्रेत असलेली संघटना बांधण्यासाठी, पक्ष वाढीसाठी आणि पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन पत्रामध्ये करण्यात आले आहे. दरम्यान या नियुक्तीबाबत योगिता आहेर यांचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, ‘मेट’च्या विश्वस्त शेफाली भुजबळ, ज्येष्ठ नेते नाना महाले, समता परिषदेचे दिलीप खैरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदींनी अभिनंदन केले आहे.