जळगाव/एनजीएन नेटवर्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या पत्रकाराला पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. आ. पाटील पत्रकाराला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. पण, ती क्लीप माझीच आहे. माझ्या नेत्यासाठी मी पत्रकाराला शिव्या दिल्या आहेत, अशी जाहीर कबुली आ. किशोर पाटील यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या मुलीच्या कुटुंबीयांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून चर्चा केली होती. पण, यावरून एका पत्रकाराने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याने आ. पैल चांगलेच संतप्त झाले. याच प्रकरणावरून किशोर पाटील यांनी पत्रकाराला शिवीगाळ केली. ती क्लीप माझीच आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. सत्य सांगण्याची हिंमत माझ्यात आहे, असे आ. पाटील म्हणाले.
——————-
@मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाची धावपळ सोडून घटनेचे गांभीर्य पाहता, चिमुकलीच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या. वकील देण्यासंदर्भात आई-वडिलांशी चर्चा केली. अशा स्थितीत एखादा पत्रकार मुख्यमंत्री चमकोगिरी करत आहेत, असे कसे बोलू शकतो? मग मी माझ्या नेत्यासाठी अशा पत्रकाराला शिव्या दिल्या आहेत.
- किशोर पाटील, आमदार, पाचोरा