पुणे/एनजीएन नेटवर्क
राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुढील तीन दिवसांसाठी महाराष्ट्राला यलो अलर्ट देण्यात आला असून हवामान विभागाने 17 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.