सटाणा/विशेष प्रतिनिधी
तालुक्यातील हरणबारी डाव्या कालव्याच्या कामास प्रत्यक्षात लवकरच सुरवात होणार आहे. त्या कामासाठी 41 कोटी 31 लाख रूपयांचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती खा. डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
सटाणा तालुक्यातील सर्व सिंचन प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता 2017 मध्ये भाजप शासनाच्या काळात मंजूर झालेली होती. त्याला लागणारा 100 कोटी रुपयां पर्यंतचा निधी आपण उपलब्ध करून ठेवलेला होता सिंचन प्रकल्पाचे सर्वच विषय प्रलंबित होते. त्यांच्या सर्व अडीअडचणी दूर करून 2017 मध्ये सर्व प्रकल्पांचे रस्ते मोकळे करून ठेवले होते. सिंचनाचे बागलाण तालुक्यातील सर्व प्रकल्प हे अपूर्ण व प्रलंबित होते त्यांचा सर्वांचा मी विस्तृत अभ्यास करून सुधारित प्रशासकीय मान्यता करून त्यास निधीही उपलब्ध करून घेतला होता त्या कामासाठी मला तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्याचे जलसंपदा सचिव इक्बाल चहल साहेब यांचे सहकार्य लाभले.
शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी मीच अधिकाऱ्यांना आग्रह धरला होता की नवीन तंत्रज्ञानाने डिझाईन करून प्रकल्प करावे जेणेकरून प्रकल्पांना जास्त देखभाल दुरुस्तीची आवश्यकता राहणार नाही . परंतु त्याला पाइपलाइनद्वारे पाणी टाकण्यात यावे असे नियोजन करण्यात आले व ते पाणी पाईपलाईनद्वारे प्रत्येक गावात पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले. सदर पाईपलाईन ची डिझाईन त्याचे अंदाजपत्रके सी.डी. ओ.मेरी नाशिक यांच्याकडे सादर करण्यात आले कागदोपत्री तांत्रिक मंजुरी व इतर तांत्रिक संमती या कामांसाठी एक वर्षाचा कालावधी गेला त्यानंतर कोरोना सारख्या जागतिक महामारीमुळे दोन वर्षे जग थांबलेले होते त्याच्यात तर हा प्रकल्प अजून दोन वर्ष लेट झाला सर्व अडचणी दूर होऊन सदर प्रकल्पाचे काम आता प्रत्यक्षात लवकर सुरु होणार आहे. त्यासाठी ठेकेदारास 41 कोटी 31 लाख रूपयांचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे . या सर्व प्रक्रिया मी 2017 पासून अशाच सांगत आलो आहे त्यामुळे हरणबारी डाव्या कालव्याचा प्रश्न मार्गी निघाला. मला हे सर्व प्रश्न एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या कार्यकाळात सोडवण्यात मला यश मिळाले याचा मला मनस्वी आनंद होत आहे. युती शासनाच्या काळात रस्ते, सिंचन, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजना ,अशा अनेक माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे .
पाईपलाईनद्वारे कालवा पहिले उदाहरण
हरणबारी डाव्या कालव्याच्या सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण झाले असून सदर कालव्याचे काम करण्याचे टेंडर मंतेना इंफरसोल प्रा.लि. हैदराबाद या हैदराबादच्या कंपनीला सदरचे काम मिळाले आहे. सदर ठेकेदारास हे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिलेले आहेत. हरणबारी डाव्या कालव्यामध्ये सर्व कालवा हा पाईपलाईनचा असल्यामुळे तो भूमिगत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांच्या भूमिअधिग्रहनाचा प्रश्न उद्भवणार नाही. त्यामुळे हा कालवा दोन वर्षात पूर्ण करावयाचा आहे. महाराष्ट्रामध्ये पाईपलाईन द्वारे कालवा ही महाराष्ट्रातील हरणबारी डावा कालवा हे पहिलं उदाहरण असेल याचा मला आनंद होत आहे. स्थानिक शेतकरी बांधवांनी उभे राहून कालव्याचे काम योग्य पद्धतीने करून करण्याचे सहकार्य करावे असे आव्हान डॉक्टर सुभाष भामरे यांनी केले या कालव्यामध्ये जैतापूर देवठाण मोहळागी माळीवाडे शेवरे तुंगण भीलवाड पिपळकोठे दसवेल अंतापुर ताहाराबाद सोमपूर दरेगाव नांदिन ,भडाने तांदुळवाड़ी व इतर गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे