- के के वाघ शिक्षण संस्था-व्हीपीकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य जनजागृती शिबीर
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मासिक पाळीदरम्यान पारंपरिक पॅडच्या तुलनेत महिलांनी मेनस्ट्रुअल कप व मेनस्ट्रुअल पँटी या आधुनिक स्वच्छता साधनांचा वापर करावा. या साधनांमुळे आरोग्याला होणारे दीर्घकालीन फायदे, सुरक्षितता, खर्च आणि पर्यावरणीय समतोल या विषयावर फॉग्सी संस्थेच्या माजी अध्यक्ष डॉ. नंदिता पालशेतकर यांनी मार्गदर्शन केले.
के के वाघ शिक्षण संस्था,नाशिक व व्हीपीकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने मुली व महिला कर्मचारी यांचेसाठी महिला आरोग्य जनजागृती शिबीर पार पडले. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलन व संस्था गीतांने करण्यात आली. संस्थेतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर फॉग्सी संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. वर्षा बस्ते, एन.ओ.जी.एस. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. नेहा लाड, डॉ. कविता गाडेकर, डॉ. श्रद्धा सबनीस, डॉ. वर्षा लहाने, डॉ. चेतना दहीवेलकर, डॉ. गौरी पिंपराळेकर, डॉ. चारुमती पेखळे, डॉ. साधना बच्छाव, संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य बाळासाहेब वाघ व विभागप्रमुख डॉ. प्रीती भामरे, प्राचार्य प्रा. पी टी कडवे व प्राचार्य डॉ. एस. एम. हाडोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.नंदिता पालशेतकर व डॉ. ब्रिजबाला तिवारी यांनी मासिक पाळी, गर्भधारणा, कर्करोग प्रतिबंध यावरील शंकांचे निरसन केले. तसेच इतर सर्व तज्ज्ञांनी महिलांमध्ये वाढणाऱ्या गर्भाशय मुखाचा कर्करोग याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी एचपीव्ही लस (HPV Vaccine) आणि पॅप स्मिअर टेस्टची गरज, उपलब्धता, योग्य वयोगट व तपासणीची प्रक्रिया याविषयी स्पष्ट मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रीती भामरे, डॉ. स्नेहल कमलापुर, डॉ. वंदना बागल, डॉ. अर्चना बेंडाळे, डॉ. सरोज ढाके व आदींनी प्रयत्न केले. अनुजा शिंदे व नक्षत्रा ठाकरे यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. गौरी पिमपलेकर यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष समीर बाळासाहेब वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी व समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर यांचे मार्गदर्शन मिळाले.
Comments are closed.