पुणे/एनजीएन नेटवर्क
प्रियकराला भेटण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर प्रियकराच्या मित्रांनीच सामूहिक अत्याचार केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून घोडेगाव पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी (दि. 23) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ती आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जंगलात गेली होती. यावेळी तिच्या प्रियकराच्या चार मित्रांनी दोघांचाही पाठलाग केला. आरोपींनी विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. घडलेला प्रकार कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारू, अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, या घटनेनंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने तातडीने घोडेगाव पोलिसांत धाव घेतली. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी चार आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.