NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

सेल्फी काढण्यासाठी थांबलेल्या महिलेवर आठ नराधमांचा बलात्कार

0

बुलढाणा/एनजीएन नेटवर्क

शहरालगतच्या राजूर घाटात एका 35 वर्षीय महिलेवर आठ नराधमांनी चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून  या प्रकरणी मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही तिच्या एका मित्रासोबत खडकी येथे राजूर घाटातून दुपारी जात होती. त्याचदरम्यान हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. स्थानिक आमदार संजय गायकवाड यांनी घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यात ठाण्यात धाव घेतली होती.

राजूर घाटात सेल्फी काढण्यासाठी पीडित महिला आणि तिचा मित्र थांबले होते. या वेळी त्या ठिकाणी आठ जणांचा घोळका आला. त्यांनी तक्रारकर्त्या व्यक्तीसोबत असलेल्या महिलेच्या गळ्याला चाकू लावून फिर्यादीच्या खिशातील 45 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर पीडित महिलेला दरीत ओढत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. दरम्यान ही  घटना समजताच आमदार संजय गायकवाड यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास बोराखेडी पोलीस ठाणे गाठले. सोबतच पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला होता. जोपर्यंत प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाणे न सोडण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणात गांभीर्याने कारवाई सुरू केली.

Leave A Reply

Your email address will not be published.