उमराणे : एनजीएन न्यूज नेटवर्क
मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २८ वर्षीय विवाहितेने दोन चिमुरड्यांसह शेतातील विहिरीत उडी घेऊन टोकाचे पाऊल उचलले आहे. हर्षाली राहुल अहिरे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून संकेत ( ५ ) आणि आरोही ( ७) अशी तिच्या मुलांची नावे आहेत. दरम्यान, हर्षालीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, हर्षालीने दोन चिमुरड्यांसह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर एकाच खळबळ उडाली. सासरच्या छळाला कंटाळूनच हर्षाली राहुल अहिरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. आत्महत्येप्रकरणी पतीसह, सासू, सासरा, नणंद या चौघांविरोधात मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मृत विवाहितेचा पती आणि सासरा यांना पोलिसांचनी ताब्यात घेतले आहे.
Comments are closed.