NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

सुरळीत संपत्ती हस्तांतरणासाठी मृत्यूपत्र आवश्यक – अॅड विद्युल्लता तातेड

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

सज्ञान व्यक्तीने स्वकष्टार्जित संपत्तीचे आपल्या प्रश्चात सुरळीतपणे व सुरक्षितपणे इच्छित व्यक्तींमध्ये वाटप व हस्तांतरण करण्यासाठी केलेला कायदेशीर दस्त म्हणजे मृत्यूपत्र होय. मृत्यू हा अटळ आहे. परंतु तो केव्हा येईल हे अनिश्चित असते .त्यामुळे आपल्या प्रश्चात कौटुंबिक कलह टाळण्यासाठी अथवा तो कमी करण्यासाठी आपण वृद्ध होईपर्यंत वाट न पाहता आपण मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम असताना शक्य तितक्या लवकर मृत्यूपत्र करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अॅड विद्युल्लता तातेड यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे आयोजित रोटरी हॉलमध्ये झालेल्या ‘ मृत्युपत्र करण्याची गरज आणि त्यासाठी घ्यावयाची काळजी’ ह्या विषयावर त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मृत्युपत्र कोणी बनवावे, का बनवावे, ते कसे बनवावे, ते बनवितांना कोणती काळजी घ्यावी, ते बनविले नाही तर त्याचे कोणते गंभीर परिणाम होतात त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे का, आदि मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर विवेचन केले. मृत्यूपत्र व बक्षीसपत्र यांच्या संबंधीच्या कायदेशीर तरतुदींची माहिती देऊन व त्या दोन्ही मधील फरक विशद करून आपल्या हयातीमध्ये आपल्या संपत्तीवर आपलेच संपूर्ण नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे सांगून आपल्या प्रश्चात आपली पत्नी /पती व त्यानंतर मुलामुलींना ती मालमत्ता मृत्यूपत्त्राद्वारे हस्तांतरित करणे कसे आवश्यक आहे ,हे देशातील बड्या उद्योग घराण्यांच्या कुटुंबांची झालेल्या वाताहातीची उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरीचे मंथ लीडर आदित्य शर्मा यांनी अॅड तातेड यांचा परिचय करून दिला रोटे.उन्मेश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. तसेच अॅड. तातेड यांच्या व्याख्यानानंतर देशमुख यांनी अॅड तातेड यांची याच विषयावर मुलाखत घेतली. रोटरीचे अध्यक्ष मंगेश अपशंकर यांनी अॅड .तातेड व उन्मेश देशमुख यांचा भेटवस्तू देऊन गौरव केला. रोटरीचे सेक्रेटरी डॉ. गौरव सामनेरकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनल कोतकर, उर्मी दिनानी, मकरंद चिंधडे,स्मिता अपशंकर, एकता अग्रवाल शिल्पा दया , दिलीपसिंग बेनिवाल यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.