मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्यभर बोलबाला झालेल्या आणि महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पांची आता शिंदे सरकारकडून श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पांवरुन आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. या प्रकल्पांवरुन राज्यात रोजगाराच्या मुद्यावरुन बराच राजकीय खल झाला होता.
राज्यातील मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत होते. आरोप झालेल्या या ४ प्रकल्पांची श्वेतपत्रिका पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पटलावर ठेवली जाणार आहे. याद्वारे आदित्य ठाकरेंना घेरण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस असणार आहे. वेदांता फॉक्सकोन, एअरबस, सॅफरोन, बल्कड्रग पार्क या चार प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिले आहेत. श्वेतपत्रिकेता जाहीर झाल्यानंतर जी माहिती समोर येईल त्यावरुन यंदाचं पावसाळी अधिवेशनच चांगलच गाजणारे ठरू शकते.