सलग अकराव्या वर्षी अभियान ; प्लॅस्टिक नदीत जाण्यापासून रोखले
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
‘व्हिसलमॅन’ म्हणून सर्वपरिचित असलेले येथील पर्यावरण प्रेमी चंद्रकिशोर पाटील दसऱ्याचे दिवशी नंदिनी नदी पुलावर उभे राहून नागरिकांना निर्माल्य नदीत टाकण्यापासून रोखतात. नागरिकांनी नदीत टाकण्यासाठी आणलेले निर्माल्य महापालिकेच्या मदतीने जमा करतात. दरवर्षी दसऱ्याला चार ते पाच टन निर्माल्य आणि प्लॅस्टिक नदीत जाण्यापासून रोखले जाते.
नाशिककरांनी सुद्धा वाढत्या जलप्रदूषणाची जाणीव ठेवत पाटील यांच्या या अभियानाला भरभरून प्रतिसाद दिला उंटवाडी येथील नंदिनी पुलावर सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पाच टन निर्माण जमा झाले. या वर्षी महानगर पालिका घनकचरा विभागाने हा उपक्रम शहरातील सर्व विभागात राबविला. नाशिककरांनी आपली गोदावरी,नंदिनी इतर सर्व नद्यामध्ये कचरा प्लॉस्टिक काहीही टाकू नये नद्या प्रदूषण होण्यापासून वाचवाव्या तरच त्या सुंदर स्वच्छ व निर्मळ अविरल राहतील.याप्रसंगी श्री राजेश पंडित, रोशन केदार, देवयानी आहेर, घनकचरा विभागाचे विशाल आवारे,संतोष बागुल, किशोर शेलार, विशाल जाधव यांनी सहकार्य केले.
“मन की बात” मध्येही मोदींकडून दखल..
चंद्रकिशोर पाटील यांच्या या कामाची दखल महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयासोबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा घेतली “मन की बात” कार्यक्रमात देशातील महत्त्वाचे स्वच्छाग्रही म्हणून त्यांच्या कामाचा गौरव करण्यात आला.यावर्षी या अभियानाचे सतत अकरावे वर्ष आहे. चंद्रकिशोर पाटील यांनी आतापर्यंत 1000 टन पेक्षा निर्माल्य, कचरा, प्लॉस्टिक नदीमध्ये जाण्यापासून वाचवला आहे.
Comments are closed.