मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्यामध्ये बोगस खते आणि बियाणे विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कित्येकदा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येते. त्यामुळे पैसा आणि वेळ दोन्हीही हातचे जाते. या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, बोगस खत-बी-बियाणे बद्दल तक्रारी असल्यास 9822446655 या नंबरवर whatsapp करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत ट्वीट करुन ही माहिती दिली. बोगस खतांच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातून तक्रारी आल्या नंतर कृषी विभागाने तात्काळ दखल घेत कारवाई करत, ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज या कंपनीचा खत विक्री परवाना निलंबित केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे पुरविण्यासाठी ‘महाबीज’चे बळकटीकरण करू. यासाठी महाबीजच्या व्यवस्थापनात लवकरच बदल करू, असे आश्वासन मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले