NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

मोदीजी अर्धसत्य नव्हे पूर्णपणे असत्य बोलले.. नाथाभाऊंचा खुलासा

0

ळगाव/एनजीएन नेटवर्क

 २०१४ साली भाजपा-शिवसेना युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेने नव्हे भाजपाने एकमुखाने घेतला होता, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केले आहे. युती तुटल्याची घोषणा मी उद्धव ठाकरेंना फोन करून केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

२०१४ मध्ये शिवसेनेने युती तोडली. आम्ही स्वत:हून युती तोडली नाही, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित एनडीए खासदारांच्या बैठकीत केले होते. त्यावर बोलताना खडसे म्हणाले, मोदीजी जे बोलले ते अर्धसत्य आहे. ते अर्धसत्यच नव्हे तर पूर्णपणे असत्य आहे. युती तोडण्याचा निर्णय भाजपाने एकमुखाने घेतला होता. मोदीजी बोलले. पण मोदीजी जे बोलले ते अर्धसत्य आहे. ते अर्धसत्यच नव्हे तर पूर्णपणे असत्य आहे. युती तोडण्याचा निर्णय भाजपाने एकमुखाने घेतला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे युती तुटल्याची घोषणा त्यांनी करायला हवी होती. पण शेवटी त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्यानंतर मी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितलं की, आजपासून आपली युती तुटली.

Leave A Reply

Your email address will not be published.