NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

368 आमदारांसाठी स्वप्नवत ‘मनोरा’.. काय सुविधा असतील नव्या वास्तूत?

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

 मंत्रालयाजवळील मनोरा आमदार निवासाचे भूमीपूजन आज पार पडले आहे. अधिवेशनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून मुंबई येणाऱ्या आमदारांना राहण्यासाठी एकाच संकुलात निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सुमारे 1200 कोटी खर्चून विधानसभेच्या 288 तर विधानपरिषदेच्या 78 अशा एकूण 368 आमदारांसाठी मनोरा निवासाची पुनर्बांधणी आजपासून सुरु होणार आहे. आमदारांसाठी असलेल्या या निवासस्थानाचे क्षेत्रफळ 1000 चौरस फुट इतकं असणार आहे. तसंच, प्रशस्त सभागृहदेखील बांधण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षात मनोरा आमदार निवासाच्या इमारती पूर्ण होण्याची शक्यता आहे. या इमारतीत जिम, कॅफेटेरिया, हायटेक किचन व प्रशस्त सभागृह बांधले जाणार आहे. 

1990 साली बांधण्यात आलेल्या मनोरा आमदार निवासातील चार इमारतींची अवस्था धोकादायक झाली होती. त्यामुळं या इमारती पाडून तिथे नवीन आमदार निवास उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या जागी दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. एक 28 तर एक 40 मजली इमारत असेल. या दोन इमारती एका ब्रीजने एकमेकांना जोडण्यात येणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पात आमदारांना पंचतारांकित सुविधा असलेले 1000 चौ फुटांची घरे देण्यात येणार आहेत. नव्या आमदार निवासांत सर्व सुविधा असलेल्या एकूण 367 खोल्या देण्यात येणार आहेत. तर, 809 कार पार्क करण्याची क्षमता असणार आहे. हायटेक किचन, व्हीआयपी लाऊंज,फिटनेस सेंटर,कॅफेटेरिया,बिझनेस सेंटर,बुक स्टोअर,लायब्ररी,मिनी थिएटर, असा सुविधा असणार आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.