मुंबई जुलै 2024: गोदरेजगोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडच्या सीड्स बिझनेसने अलीकडेच त्यांच्या चॅनल भागीदारांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत तीन नवीन उत्पादनांची घोषणा केली. मका आणि भाताच्या संकरित बियाण्यांचा सध्याचा पोर्टफोलिओ मजबूत करत, कंपनीने मक्यामध्ये नवीन GMH ६०३४ आणि GMH ४११० तर भातामध्ये नव्या हे नवीन बियाणे लाँच करण्याची घोषणा केली. या माध्यमातून मजबूत R&D क्षमतांचा लाभ घेण्यावर आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेणारे नवीन संकरित वाण विकसित करण्याच्या दिशेने काम सुरू ठेवण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अशाच उपक्रमातून भारतीय शेतकऱ्यांची सेवा आणि उन्नतीसाठी असलेली कंपनीची वचनबद्धता समोर येते.
या व्यवसायावर भाष्य करताना, गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडचे पीक संरक्षण व्यवसाय, सीईओ, राजावेलू एन के म्हणाले, “शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल, असे उपाय सादर करण्याचा गोदरेज ॲग्रोव्हेटचा प्रयत्न आहे. बियाणे उद्योगात ज्यांचे स्वतःचे R&D आहे, अशा कंपन्यांमध्ये गोदरेज ॲग्रोव्हेटचा समावेश होतो. पीक संरक्षणासह बियाणे ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांना मदत करण्याचे आमचे ध्येय आहे.”
गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडच्या बियाणे व्यवसायाने स्थापनेपासूनच भारतीय शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट जर्मप्लाझम सादर करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रदेश आणि ऋतुनुसार येथे असलेली विविधता लक्षात घेऊन, तसेच शेतकऱ्यांची विविध कालावधीची गरज ओळखून हे संकरित बियाणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विकसित केले
जाते. “आमच्या बहुतेक संकरित प्रजाती या रोग, दुष्काळ आणि कोणत्याहीपरिस्थितीत जुळाऊन घेणारे आहेत. आमच्या सध्याच्या हायब्रीड्सना शेतकरी आणि चॅनेल पार्टनर्सकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, बियाणे पॅक करण्यापूर्वीच आम्ही त्याच्या दर्जाबाबत काळजी घेऊ आणि मगच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू, असे राजवेलू एन.के. यांनी सांगितले. मक्यातील GMH ६०३४ आणि GMH ४११०, तसेच भातातील नव्या या नवीन बियाण्यांची सुरुवात आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आली आहे. कंपनी आगामी काही महिन्यांत हे बियाणे बिहार, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये लाँच करेल.