NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

बागलाण भाजपमध्ये पदाधिकारी बदलाचे वारे…. इच्छुकांची मांदियाळी !

0

** निलेश गौतम

डांगसौंदाणे/

बागलाण भाजप तालुकाध्यक्ष सह शहर अध्यक्ष नियुक्तीसाठी पक्षाकडुन स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच सटाणा येथील वाणी मंगल कार्यालयात बैठक घेण्यात आली. पक्ष निरीक्षक अजय भोये यांनी या बैठकीत उपस्थित राहत इच्छुक कार्यकर्त्यांच्या बंद दरवाजा आड मुलाखती घेतल्या आहेत. तालुका आणि शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या पाहता पक्ष निरीक्षकांनी सर्वच इच्छुकांच्या मुलाखती धावत्या स्वरूपात घेत मते जाणुन घेतली आहेत.

विद्यमान तालुकाध्यक्ष संजय देवरे, शहराध्यक्ष राहुल सोनवणे यांनी ही परत आपल्या पदांसाठी मुलाखती दिल्या आहेत तर माजी तालुकाध्यक्ष संजय भामरे, बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे यांच्या सह अनेकांनी तालुकाध्यक्ष पदासाठी मुलाखती दिल्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभुमीवर मिशन 2024 साठी पक्षश्रेष्टी तालुका अध्यक्ष पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात घालणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शहर अध्यक्ष पदासाठी विद्यमान अध्यक्ष राहुल सोनवणे यांचे सह समको बँकेचे संचालक पंकज ततार, जगदीश मुंडावरे ,माजी नगरसेवक नितीन काका सोनवणे, यांचे सह अनेक चेहरे शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असले तरी पक्षश्रेष्टी नेमकी शहर अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार? की आहे त्या पदाधिकारीना कायम ठेवणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार असले तरी सध्या इच्छुकांची भाऊगर्दी पाहता पक्षाआंतर्गत बंडाळी होणार नाही याची काळजी ही पक्षश्रेष्ठींना घ्यावी लागणार आहे.

बागलाण भाजपात दोन गट आहेत हे सर्वंश्रुत आहे या पैकी एक खासदार गट तर दुसरा आमदार गट म्हणून ओळखला जातो खासदार आमदार दोघे ही भाजपाचे असले तरी दोघांच्या राजकीय पाऊलखुणा ह्या वेगवेगळ्या मानल्या जातात दोघाकडे आप आपले कार्यकर्त्यांचे वलय आहे. अश्यात तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष नेमतांना दोघा ही लोकप्रतिनिधींना सावध भूमिका घेत पक्षाला कुठलेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.

विद्यमान तालुकाध्यक्ष खासदार गटाचे मानले जातात तर शहर अध्यक्ष ही खासदार गटाचे असल्याचे बोलले जाते अशातच भाजपा ने विधानसभा अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर केल्या आहेत यात ग्रामीण भागात अल्पवयात आपल्या राजकीय कारकीर्दीचा ठसा उमटविणारे बाजार समितीचे माजी सभापती पंकज ठाकरे यांची नियुक्ती केली आहे .
पंकज ठाकरे आमदार गटाचे असल्याचे बोलले जाते यातच आता भाजपाने पक्षाचे जिल्हाध्यक्ष बदल केल्यानंतर आता तालुका पातळीवरील संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. या साठी बाहेर जिल्ह्यातील पक्ष निरीक्षक या साठी वरिष्ठ पातळीवरून नेमण्यात आले आहेत या पक्ष निरीक्षकांनी तालुक्यांचा अहवाल वरिष्ठ पातळी वर प्रदेश कार्यकारणी कडे 10 तारखेपर्यंत सुपूर्द करायचे आहेत.

2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पक्षाला प्रभावी व जनमानसात प्रतिमा असलेल्या व्यक्ती ला आता जबाबदारी द्यावी लागणार आहे तालुका अध्यक्ष नेमतांना आमदार आणि खासदार यांचे मत जाणून घेतात की? पक्ष कार्यकर्त्यांचे मत जाणुन तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्षची नेमणुक करतात? हे ही या प्रक्रियेत महत्वाचे ठरणार आहे. पक्ष निरीक्षक अजय भोये यांनी बंद दरवाजा आड कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा अहवाल कसा पाठवतात यावर ही या नेमणुकी ला महत्व असणार आहे. तालुकाध्यक्ष पदासाठी मुलखात दिलेल्या प्रबळ दावेदारांपैकी असलेले माजी तालुकाध्यक्ष संजय भामरे यांनी यापुर्वीच तालुकाध्यक्ष म्हणुन कामकाज पाहिले आहे. मोसम खोऱ्यातील भामरे हे इंजिनियर असले तरी ते खासदार भामरे यांचे नातेसंबंधातील असल्याने ते खासदार गटाचे समजले जातात तर विद्यमान तालुकाध्यक्ष असलेले संजय देवरे पूर्व भागातील लखमापुर चे आहेत बाजार समितीवर संचालक ते सभापती असा त्यांचा प्रवास आहे. प्रखड आणि सडेतोड बोलणे हा त्यांचा स्वभाव असला तरी राजकारणात प्रखड भाष्य कधी कधी राजकीय पुढाऱ्यांना त्रासदायक ठरते हे ही लक्ष्यात घेयाला हवे.

पश्चिम भागातुन तालुकाध्यक्ष पदासाठी मुलाखत देणारे संजय सोनवणे हे ही या पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. बाजार समितीचे संचालक ते सभापती, पत्नी पंचायत समितीच्या माजी उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य राहिल्या आहेत, तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशिल असलेल्या डांगसौंदाणे ग्रामपंचायतीवर गत 15 वर्ष सोनवणे यांची निर्विवाद सत्ता आहे. पश्चिम भागातील आदिवासी बहुल भागावर त्यांची राजकीय पकड आहे. आमदार दिलीप बोरसे, आणि खासदार सुभाष भामरे दोघांशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले सोनवणे यांचेवर कुठल्याही गटाचा शिक्का नाही सोनवणे तालुक्याच्या राजकीय क्षेत्रातील प्रस्थापित नाव आहे. सोनवणे यांची जर तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालीच तर पहिल्यांदाच तालुक्याला पश्चिम भागाला एका मोठ्या राजकीय पक्ष्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. तर या भागातील आदिवासी मतदार ही पक्षाकडे वळविण्यास मदत होईल पक्ष वाढी साठी संधी उपलब्ध होणार आहे.

शहर अध्यक्ष पदासाठी अनेक जण दावेदार असले तरी विद्यमान शहर अध्यक्ष राहुल सोनवणे यांची पकड।मजबुत आहे राजकीय जीवनात।निडर आणि प्रखड भूमिका मांडणारे राहुल सोनवणे सटाणा शहरातील सहकारातील अग्रगण्य असलेल्या दक्षिण सोसायटीत सत्तेत आहेत तर याच पदाला मुलाखत देणारे पंकज ततार हे माजी नगराध्यक्ष व भाजपाचे तत्कालीन प्रमुख शिलेदारांपैकी एक असलेले दिवंगत सुभाष ततार यांचे सुपुत्र आहेत पंकज ततार हे समको चे विद्यमान संचालक आहेत तर माजी चेअरमन आहेत बहुजन चेहरा म्हणुन त्यांना संधी मिळाली तर शहरातील पक्ष संघटन वाढीस संधी मिळणार आहे.
याच पदासाठी नितीन काका सोनवणे यांनी ही मुलाखत दिली आहे. माजी नगरसेवक असलेले सोनवणे यांची युवा वर्गात पकड आहे त्यांची ही पक्षाला मदत होऊ शकते.

समको संचालक असलेले जगदीश मुंडावरे ही या स्पर्धेत आहेत खा भामरे यांचे निकटवर्तीमध्ये मुंडावरे गणले जातात इच्छुकांची मांदियाळी बघता पक्षाला सर्व बाबींचा विचार करत पक्ष्याची तालुका कार्यकारणी व शहर कार्यकारणी जाहीर करावी लागणार आहे. पक्षाला राजकीय समतोल साधत जातीय समिकरणांची ही जुळवाजुळव करीत नियुक्त्या कराव्या लागणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.