वडोदरा : वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडला आपल्या उत्पादन श्रेणीमध्ये डब्ल्यूओएल हे नवे एनर्जी ड्रिंक समाविष्ट करताना अभिमान वाटत आहे. या नाविन्यपूर्ण उत्पादनामुळे प्रीमियम उत्पादन श्रेणीतील कंपनीचे स्थान मजबूत झाले आहे. या उत्पादनासाठी कंपनीने टेनिस प्रीमियर लीग, सीझन ५ बरोबर सहकार्य केले असून या धोरणात्मक भागिदारीच्या माध्यमातून ठसा उमटवण्यासाठी कंपनी उत्सुक आहे.
वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडचे हे नव्याने लाँच करण्यात आलेले उत्पादन डब्ल्यूओएल एनर्जी ड्रिंक गुणवत्तेचा मापदंड असून ट्रेंडसेटिंग आणि महत्त्वाकांक्षी तरुणाईसाठी ते खास तयार करण्यात आले आहे. यामध्ये आकर्षक चव, असामान्य दर्जा आणि भुरळ टेनिस प्रीमियर लीगसाठी हजेरी लावणाऱ्या क्रीडाप्रेमींशी सुसंगत आहे. या भागिदारीमुळे विविध प्लॅटफॉर्म्सवरील प्रेक्षकांशी संवाद साधण्याची ब्रँडची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. पहिल्या टप्प्यात गुजरात व महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. हे उत्पादन वडोदरा, गुजरात येथे लाँच करण्यात आले असून तिथे या उत्पादनाच्या पुढील महत्त्वाकांक्षी विस्तार योजनेचा पाया रचण्यात आला आहे.
या भागिदारीविषयी वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौ. शीतल भालेराव म्हणाल्या, ‘वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडअंतर्गत डब्ल्यूओएल एनर्जी ड्रिंक हे आमचे उत्पादन सादर करताना आनंद होत आहे. टेनिस प्रीमियर लीगबरोबर करण्यात आलेली ही भागिदारी आमच्या इच्छित ग्राहकवर्गासाठी दर्जेदार उत्पादने सादर करण्याची बांधिलकी दर्शवणारी आहे. टेनिस प्रीमियर लीगसह आमची भागिदारी कंपनीच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा आहे. या भागिदारीच्या पलीकडे जात डब्ल्यूओएल एनर्जी ड्रिंकच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण भविष्य तयार करण्याचे आणि वेगवेगळ्या प्रदेशांत आमची बाजारपेठ विकसित करण्याचे ध्येय आहे. डब्ल्यूओएल एनर्जी ड्रिंक हे उर्जा वाढवणारे पेय असून ते आमच्या ग्राहकांसाठी रसरशीतपणे, उत्साहाने जगण्याचे प्रतीक आहे.’
डब्ल्यूओएल एनर्जी ड्रिंक आणि टेनिस प्रीमियर लीग यांच्यातील सहकार्य आश्वासक भागिदारी अधोरेखित करणारे आहे, शिवाय त्यामुळे वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडला या लीगच्या निमित्ताने भारवलेल्या क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणे शक्य होईल.