वडोदरा : वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीला सध्या सुरू असलेल्या इंडस फुड सोहळ्याच्या सातव्या आवृत्तीमध्ये सहभागी होताना आनंद होत आहे. हे प्रदर्शन इंडिया एक्सपोझिशन मार्ट, ग्रेटर नॉयडा, एनसीआर येथे ८ ते १० जानेवारी २०२४ दरम्यान संपन्न झाला.
दक्षिण आशियातील सर्वात प्रतिष्ठित एफअँडबी शो म्हणून ओळखला जाणारा इंडसफुड भारतातही प्रचलित असून त्यामध्ये ८५ देशांतील जागतिक दर्जाचे १२०० खरेदीदार सहभागी होतात. त्यात सहभागी होणाऱ्या भारतीय प्रदर्शकांची संख्या ५५० आहे. या सोहळ्यात संवाद, नेटवर्किंगसह इतर प्रकारच्या असंख्य संधी उपलब्ध होतात व त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ क्षेत्रातील कंपनीचा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन मांडण्यासाठी संधी मिळते. इंडसफुडमध्ये वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडतर्फे सर्वसमावेशक उत्पादन श्रेणी मांडण्यात आली असून त्यात प्रामुख्याने क्विकशेफ (रेडी-टु-इट, मसाल्याचे पदार्थ, सॉसेस व मसाले), स्नॅक बडी
(रेडी-टु-इट, मसाल्याचे पदार्थ, ड्रेसिंग, सिझनिंग, फ्रोझन उत्पादने) आणि डब्ल्यूओएल एनर्जी ड्रिंक यांचा समावेश आहे. कंपनीतर्फे होरेका फ्रोझन फुडवर जास्त भर देत निर्यात बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
कंपनीतर्फे अद्ययावत उत्पादने आणि क्लीन लेबल सॉसेस सादर करत नाविन्य तसेच बाजारपेठेच्या गरजांना प्रतिसाद देण्याची बांधिलकी दर्शवण्यात आली आहे. क्लीन लेबल उत्पादनांना परदेशी बाजारपेठेत असलेली मागणी लक्षात घेऊन कंपनीने मोठ्या ग्राहकवर्गासाठी क्लीन लेबल श्रेणी सादर करण्याचे ठरवले आहे. त्याशिवाय क्लीन लेबल टोमॅटो केचअप हे क्रांतीकारी उत्पादन प्रतिष्ठित इंडसफुड इनोव्हेशन झोनमध्ये (आयआयझेड) मांडण्याची संधी मिळाल्याचे जाहीर करताना वॉर्डविझार्ड
फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडला अभिमान वाटत आहे. हा झोन क्रांतीकारी आणि प्रवर्तकीय उत्पादने सादर करण्यासाठी आकर्षक प्लॅटफॉर्म असून आपले क्लीन लेबल टोमॅटो केचअप या प्लॅटफॉर्मचे मुख्य तत्व असलेल्या नाविन्याशी पूर्णपणे सुसंगत असल्याचे वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडला वाटते.
या कार्यक्रमाविषयी वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या अध्यक्ष सौ. शीतल भालेराव म्हणाल्या, ‘इंडस फुडच्या सातव्या आवृत्तीमध्ये सहभागी होताना आम्हाला आनंद होत असून या प्लॅटफॉर्ममुळे जागतिक स्तरावरील ग्राहकांना सेवा देणे आम्हाला शक्य झाले आहे. परदेशात भारतीय पदार्थांना असलेली मागणी आणि नाविन्य व दर्जाप्रती आमची बांधिलकी यांच्या मदतीने जागतिक ग्राहकांच्या आवडीनिवडी पूर्ण करणारी खास उत्पादने आम्ही तयार केली आहेत. त्याशिवाय इंडसफुड
इनोव्हेशन झोनमधील आमची उपस्थिती गुणवत्तेचा आमचा ध्यास दर्शवणारी आहे. जागतिक स्तरावरील अस्तित्व विस्तारण्यासाठी आणि रिटेल व होरेका क्षेत्रातील आमच्या अनोख्या उत्पादनांच्या मदतीने भारतीय खाद्यपदार्थांच्या वैविध्यपूर्ण स्वादांची लोकप्रियता वाढवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’