NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडतर्फे ‘वर्ल्ड फूड इंडिया’मध्ये सहभाग

0

वडोदरा : वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड ही खाद्यपदार्थ आणि पेय क्षेत्रातील आघाडीची कंपनी वर्ल्ड फुड इंडिया २०२३ मध्ये लक्षणीय स्तरावर सहभागी झाली. हा कार्यक्रम ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान प्रगती मैदान, दिल्ली येथे सुरू होणार असून ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू होता.

वर्ल्ड फुड इंडिया २०२३ हा भारतीय खाद्यपदार्थ अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा कार्यक्रम ठरला असून त्यामुळे भारतीय आणि परकीय गुंतवणुकदारांमध्ये भागिदारीसाठी वाव मिळाला. वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडने आपल्या विस्तृत उत्पादन श्रेणीसाठी दोन वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड नावांचे वर्गीकरण करून आपल्या उत्पादन धोरणात महत्त्वाचा बदल केला आहे. या घोषणेनुसार सर्व रिटेल उत्पादनांनावर ‘क्विकशेफ’ हे ब्रँड नाव अभिमानाने झळकले, तर होरेका (हॉटेल, रेस्टरंट आणि केटरिंग) श्रेणी ‘स्नॅक बडी’ या बॅनरअंतर्गत चमकले.

वर्ल्ड फुड इंडिया २०२३ मधील कंपनीचा सहभाग आपल्या वैविध्यपूर्ण ग्राहकवर्गाला असामान्य खाद्यानुभूती देण्याची आणि ब्रँडिंगसाठी प्रगतीशील दृष्टीकोन अवलंबण्याची कंपनीची बांधिलकी दर्शवणारा ठरला. कंपनी बीटुबी आणि निर्यातीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या व्हिजिटर्सचे आपली सर्वसमावेशक उत्पादन श्रेणी अनुभवण्यासाठी याहास्वी झाली. तज्ज्ञ व्यावसायिकांनी तयार केलेल्या चविष्ट खाद्यपदार्थांची चव व्हिजिटर्सनी घ्यावी यासाठी कंपनीने सुसज्ज स्वयंपाकघर तयार केले होते.

वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लि.च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौ. शीतल भालेराव म्हणाल्या, ‘वर्ल्ड फुड इंडिया २०२३ चा एक भाग होताना आणि आमची नव्याने तयार करण्यात आलेले उत्पादन वर्गीकरणाचे धोरण सादर करताना आनंद झाला. आमचे रिटेल आणि होरेका उत्पादन श्रेणी वेगवेगळी सादर करून ग्राहकांना जास्त सुस्पष्टता आणि सुयोग्य अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे. ग्राहकांच्या सातत्याने बदलणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी उच्च दर्जाचे आणि नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ उपलब्ध करण्याची बांधिलकी दर्शवण्यासाठी आमचा उद्देश सफल झाला.

या एक्स्पोमध्ये वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड क्विकशेफ रिटेल श्रेणी अभिमानाने सादर करण्यात आली असून या श्रेणीत विविध प्रकारच्या उत्पादनांचा समावेश राहिला. त्यात रेडी-टु-ईट (आरटीई) मील्स, फ्रोजन उत्पादने, मसाले आणि सॉसचे स्वादिष्ट प्रकार यांचा समावेश असेल. त्याशिवाय स्नॅक बडी होरेका श्रेणीसुद्धा प्रामुख्याने मांडण्यात आली असून त्यामुळे कार्यक्रमाची व खाद्यपदार्थांची रंगत वाढली.

कंपनीने मसाल्यांची नवी श्रेणी लाँच करत नुकतीच आपली उत्पादन श्रेणी विस्तारली. नवरात्रीच्या उत्सवाची योग्य वेळ साधत ही श्रेणी लाँच केली होती. खाद्यपदार्थ व्यावसायिक तसेच घरगुती शेफ्स यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजा आणि चवीची आवड पूर्ण करण्यासाठी ही श्रेणी खास तयार करण्यात आली आहे. या विस्ताराच्या निमित्ताने नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार उत्पादने उपलब्ध करण्याची आणि खाद्यअनुभूती उंचावण्याची कंपनीची दृढ बांधिलकी परत दिसून आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.