वडोदरा : महिला दिन २०२४ साजरा करण्यासाठी “#SheVentures या अनोख्या उपक्रमाचे आयोजन वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीने केले असून त्याद्वारे वर्षभर या दिवसाचा उत्साह कायम राखला जाणार आहे. वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि दूरदर्शी लीडर शीतल भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील स्वावलंबी स्त्रियांना आधार देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे स्त्रियांना त्यांच्या जीवनाच्या विविध पैलूंसाठी ताकद आणि आत्मविश्वास मिळवून देण्याचे ध्येय ठेवण्यात आले असून त्यांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यावरही भर दिला जाणार आहे. वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवून सर्वसमावेशक आणि सक्षम समाज तयार करण्यासाठी बांधील आहे.
हा उपक्रम स्वतःच्या बळावर पैसे मिळवू इच्छिणाऱ्या, व्यावसायिक कौशल्ये शिकण्याची व आपल्या कुटुंबाला चांगले जीवनमान देण्यासाठी उत्सुक असलेल्या स्त्रियांना सक्षम करण्यावर आधारित आहे. वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस १०,००० स्त्रियांना कंपनीची क्विकशेफ/स्नॅकबडी ही उत्पादने वापरून चविष्ट खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे.
वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शीतल भालेराव आपला उत्साह व्यक्त करत म्हणाल्या, ‘आम्ही कायमच महिला सबलीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे.
वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शीतल भालेराव आपला उत्साह व्यक्त करत म्हणाल्या, ‘आम्ही कायमच महिला सबलीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. SheVentures या उपक्रमातून आम्ही त्यांना कौशल्याचे प्रशिक्षण देणार आहोतच, शिवाय सामर्थ्यवान, स्वावलंबी, देशाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या स्त्रियांचा समाज तयार करण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. एकत्रितपणे आपण सर्वसमावेशक व सक्षम समाज तयार करूया.’