वडोदरा : महिला दिन २०२४ साजरा करण्यासाठी “#SheVentures या अनोख्या उपक्रमाचे आयोजन वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीने केले असून त्याद्वारे वर्षभर या दिवसाचा उत्साह कायम राखला जाणार आहे. वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि दूरदर्शी लीडर शीतल भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील स्वावलंबी स्त्रियांना आधार देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे स्त्रियांना त्यांच्या जीवनाच्या विविध पैलूंसाठी ताकद आणि आत्मविश्वास मिळवून देण्याचे ध्येय ठेवण्यात आले असून त्यांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यावरही भर दिला जाणार आहे. वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवून सर्वसमावेशक आणि सक्षम समाज तयार करण्यासाठी बांधील आहे.
हा उपक्रम स्वतःच्या बळावर पैसे मिळवू इच्छिणाऱ्या, व्यावसायिक कौशल्ये शिकण्याची व आपल्या कुटुंबाला चांगले जीवनमान देण्यासाठी उत्सुक असलेल्या स्त्रियांना सक्षम करण्यावर आधारित आहे. वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस १०,००० स्त्रियांना कंपनीची क्विकशेफ/स्नॅकबडी ही उत्पादने वापरून चविष्ट खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे.
वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शीतल भालेराव आपला उत्साह व्यक्त करत म्हणाल्या, ‘आम्ही कायमच महिला सबलीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे.
वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शीतल भालेराव
आपला उत्साह व्यक्त करत म्हणाल्या, ‘आम्ही कायमच महिला सबलीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. SheVentures या उपक्रमातून आम्ही त्यांना कौशल्याचे प्रशिक्षण देणार आहोतच, शिवाय सामर्थ्यवान, स्वावलंबी, देशाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या स्त्रियांचा समाज तयार करण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. एकत्रितपणे आपण सर्वसमावेशक व सक्षम समाज तयार करूया.’
सामर्थ्यवान, स्वावलंबी, देशाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या स्त्रियांचा समाज तयार करण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. एकत्रितपणे आपण सर्वसमावेशक व सक्षम समाज तयार करूया.’ वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेसद्वारे सर्वसमावेशक प्रशिक्षणातून स्त्रियांना क्विकशेफ/स्नॅकबडी उत्पादने वापरून रूचकर जेवण बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा उपक्रम होम शेफ्सना क्लाउड किचनची ताकद समजावून देण्यासाठी, नाविन्य व औद्योगिक वृत्तीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील
आहे. कंपनीद्वारे या होम शेफ्सना लोकप्रिय फुड डिलिव्हरी अॅप्स व अॅग्रीगेटर्सवर नोंदणी करण्यासाठी तसेच आवश्यक ते एफएसएसएआय परवाना मिळवण्यासाठी आणि इतर नियमांचे पालन करण्यासाठी मदत करतील.
देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व स्त्रियांना या खास संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून वॉर्डविझार्डची टीम त्यांना त्यांच्या प्रमाणे प्रशिक्षण सत्रासाठी संपर्क करेल. सुरुवातीला चालना मिळावी यासाठी कंपनी पहिल्या ऑर्डर्स क्रेडिटवर देणार असून त्यामुळे होम शेफ्सना आर्थिक चिंता करावी लागणार नाही व उत्पन्न मिळवेपर्यंत व्यवसाय उभारणीवर लक्ष केंद्रित करता येईल.
त्यांच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी सहभागींना वॉर्डविझार्डतर्फे प्रमाणपत्र देऊन खाद्यसंस्कृतीसाठी व आपल्या समाजासाठी त्या देत असलेल्या योगदानाचा सन्मान केला जाईल. वॉर्डविझार्ड फूड अँड बेव्हरेजेस लिमिटेड या उपक्रमाच्या माध्यमातून दीर्घकाळ टिकणारा प्रभाव तयार करण्यासाठी, स्त्रियांना आपल्या आयुष्याचं नियंत्रण स्वतःच्या हातात घेण्यासाठी व स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी उज्ज्वल भवितव्य तयार करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी सज्ज आहे. कृपया भेट द्या -https://wardwizardfoods.com/sheventures .