मुंबई/एनजीएन नेटवर्क
वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड या खाद्यपदार्थ क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एका कंपनीने नुकताच अनुफूड इंडिया २०२३ या प्रतिष्ठित बीटुबी आणि एक्स्पोर्ट कार्यक्रमात सहभाग नोंदवला. दि. ७ ते ९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे हा उपक्रम घेण्यात आला.
कंपनीने होरेका (हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरिंग) उत्पादन श्रेणी या प्रदर्शनात उपलब्ध करून दिली. त्यात सॉसेस, मसाले, रेडी-टु-इट (आरटीई) मील्स, फ्रोझन फुड यांचा समावेश राहिला. अनुफूड इंडिया २०२३ हा या क्षेत्रातील व्यावसायिकांना खाद्यपदार्थ आणि पेय क्षेत्रातील नवीन ट्रेंड्स जाणून घेण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म राहिला. वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौ. शीतल भालेराव म्हणाल्या, ‘अनुफूड इंडिया २०२३ मध्ये सहभागी होत या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी होरेका श्रेणी सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. खाद्यपदार्थ क्षेत्र सातत्याने बदलत असून अनुफूड इंडिया २०२३ मधील आमचा सहभाग देशांतर्गत व परदेशातील मोठ्या ग्राहकवर्गाला सेवा पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. कंपनी भागधारकांशी संवाद साधण्यासाठी व एकमेकांच्या सहकार्याने खाद्यपदार्थ क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही उत्सुक आहे. दर्जा व ग्राहक समाधानाप्रती आमची बांधिलकी हा आमच्या कामाचा केंद्रबिंदू आहे आणि कंपनीची नवी उत्पादने सर्वांना उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद झाला.
बिझनेस-टु-बिझनेस (बीटुबी) संवाद आणि निर्यातीच्या संधींवर भर देणाऱ्या अनुफूड इंडियाचे महत्त्व वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेसला समजते. कंपनीने होरेका श्रेणी उपलब्ध करून दिली. त्यात दर्जेदार सॉसेस, मसाले, सोयीस्कर रेडी-टु-इट (आरटीई) मील्स, रूचकर फ्रोझन फुड यांचा समावेश राहिला.