NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

नाशकात गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रविवारी व्यापारी संवाद संमेलन 

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

येत्या रविवारी ( दि. १८) मोदी @ 9 अभियाना अंतर्गत मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत व्यापारी संवाद संमेलन होणार असल्याची माहिती भाजप नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे यांनी दिली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सत्तेत येऊन 9 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे  मंत्री ना. गिरीश महाजन (ग्रामविकास वैद्यकीय शिक्षण क्रीडा व युवकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य) त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथील व्यापाऱ्यांसमवेत संवाद संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे  पूर्ण झाल्याने संपूर्ण देशभर जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाकचाच भाग म्हणून हे व्यापारी संमेलन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे  व नाशिक महानगर आघाडी संयोजक शशिकांत शेट्टी यांनी दिली.

नियोजित व्यापारी संमेलन हे कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह के.टी.एच.एम. कॉलेज प्रांगण गंगापूर रोड नाशिक येथे  सकाळी नऊ वाजता संपन्न होत असून या कार्यक्रमात नाशिक औद्योगिक जगतातील प्रथित यश उद्योगपती नाशिक  इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या स्टार्टअप अँड स्टार्टअप कौन्सिल कमिटीचे श्रीकांत पाटील सुद्धा यावेळी व्यापारी संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान ना.गिरीश महाजन हे या  संवाद मेळाव्यास मार्गदर्शन करणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे अशी माहिती व्यापारी आघाडीचे संयोजक शशिकांत शेट्टी यांनी दिली आहे. 

       व्यापारी आघाडी पदाधिकाऱ्यांबरोबर व्यापारी संवाद संमेलन  नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीस नाशिक महानगर भाजपा अध्यक्ष गिरीश पालवे ,आ.देवयानी फरांदे , आ.सीमा हिरे, आ.राहुल ढिकले,  प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, दिंडोरी लोकसभा प्रभारी बाळासाहेब सानप, ज्येष्ठ नेते विजय  साने, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव , सरचिटणीस पवन भगूरकर, व्यापारी आघाडी सयोंजेक शशिकांत शेट्टी आदींच्या प्रमुख  उपस्थितीत  बैठक पार पडली.

यावेळी गौतम हिरण  यांनी बैठकीचे प्रास्तविक केले, सूत्रसंचलन जितेंद्र चोरडिया यांनी केले तर आभार सुरज राठी यांनी मानले. यावेळी बैठकीस राघवेंद्र जोशी, प्रतीक नांदुर्डीकर, जितेंद्र चोरडिया, कैलास पाटील, शरद निकम, गिरीश जोशी, उदय पाटील, करूनेश पाठक, गजानन भुसारी, आनंद गौड, विजय कुकरेजा, प्रकाश काडीले, परेश बोगाणी, रवी  जैन, मनीष रघुवंशी, राजेश नंदवानी, गोविंद शर्मा, आमोद सहाणे, दिनेश भोसले, विनोद बिरारी, प्रमोद कळसकर, नितीन देशपांडे, विद्या खरात, सतीश बोरा, कीर्ती बोरा, गोविंद शिंदे, किशोर अंकाईकर, श्याम लीलारमाणी, उमेश राठोड, राजेंद्र कासट आदी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.