NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

सटाण्यात आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण; शांतता प्रस्थापित..

0

सटाणा/एनजीएन नेटवर्क

मणिपूर घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी आज शहरात निघालेल्या आदिवासी बांधवांच्या मोर्चाला हिंसक वळण लागले. पोलिसांशी झालेल्या वादानंतर मोर्चातील एका गटाने वाहनांवर दगडफेक केली, तर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार केला. या घटनेमुळे सटाणा शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या शहरात शांतता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, मणिपूर घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी सटाणा शहरात बहुजन वंचित आघाडी, आदिवासी एकता परिषद,एकलव्य आदिवासी संघटना यांच्या माध्यमातून मोर्चा आयोजित करण्यात आला होता. हजारो तरुणांनी संबंधित घटनेचा निषेध करत अर्ध नग्न मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. मोर्चेकरी तहसील कचेरीवरील मैदानावर एकत्र आले. त्यावेळेस मणिपूर येथे घडलेल्या घटना संदर्भात काही व्यक्ती भाषण करीत असताना काही आंदोलक सटाणा येथील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर जाऊन थेट रस्त्यावर जाऊन घोषणा देऊ लागले. घोषणा देत असताना प्रशासनामार्फत आंदोलन करणाऱ्यांना समज देण्यात आली. मात्र, आंदोलनकर्त्यांची संख्या मोठी असल्यामुळे सहजासहजी आटोक्यात येण्यासारखा प्रश्न दिसत नव्हता. परिणामी अतिरिक्त पोलीस बळ मागवण्यात आले.

    आंदोलकांमध्ये एकमत झाले नसताना वेगवेगळ्या गटात बाचाबाची सुरू झाली. अशा वेळेस पोलिसांची कुमक कमी असल्याने व त्याच वेळेस पोलीस उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी घटनास्थळी उपस्थित झाले त्यांनी आंदोलकांना समज देण्याचा प्रयत्न केला.. परंतु आंदोलन ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. पर्याय नसल्याने गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ आली त्याच वेळेस काही आंदोलकांनी विंचूर प्रकाशा महामार्गावर जाणाऱ्या वाहनांवर दगडफेकही केली तेव्हा सटाणा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले अनेक दुकाने ताबडतोब बंद झाली शहरात तणाव निर्माण झाल्यामुळे घडलेला प्रकार वाऱ्यासारखा सगळीकडे पसरला आणि चर्चेला उधाण आले.

       आंदोलनाला गालबोट लागल्यामुळे काही काळ शहरात तणावाचे वातावरण होते नंतर हळूहळू वातावरण पूर्ववत झाले..

Leave A Reply

Your email address will not be published.