- इतर चौघांची देखील विश्वस्तपदी निवड; मान्यवरांकडून अभिनंदन
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणीच्या श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्तपदी सनदी लेखापाल तथा सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते विष्णू त्र्यंबकराव वारुंगसे यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय, इतर चार विश्वस्तांच्या नावांची देखील घोषणा करण्यात आली आहे.
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्तपद अत्यंत मानाचे समजले जाते. त्यासाठी विविध निकष लावण्यात येत असल्याने योग्य व्यक्तींच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात येते. वारुंगसे हे एक क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते समजले जातात. नाशिकमधील प्रेरणा एकता संस्थेचे ते सचिव आहेत. त्यांच्याशिवाय, विधिज्ञ राहुल अशोक खुटाडे, डॉ. राजेंद्र सुरेश वराडे, दिलीपकुमार दुबालाजी देशमुख आणि डॉ. कांचन रमेश देसले यांचीही विश्वस्त मंडळात वर्णी लागली आहे. दरम्यान, या निवडीनिमित्त विष्णू वारुंगसे आणि इतर विश्वस्तांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले.
Comments are closed.