सिन्नर/एनजीएन नेटवर्क
दोडी बु येथील कवी लेखक वृक्षमित्र श्री विष्णू तानाजी वाघ यांना त्यांनी केलेल्या वृक्षमित्र फाऊंडेशन च्या माध्यमातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या सामाजिक कामामुळे पुणे येथील काव्यात्मा साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा "काव्यात्मा वृक्षमित्र युवा पुरस्कार २०२३" नुकताच जाहीर झाला आहे. पुढील महिन्यात पिंपळे गुरव ,पुणे येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पर्यावरणाचा समतोल रहावा, वृक्षारोपणाचे, वृक्षसंवर्धनाचे काम समाजात जे चांगल्या प्रकारे करतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो, विष्णू वाघ यांनी सिन्नर तालुक्यात अनेक शाळांच्या परिसरात वृक्षारोपण केले तसेच वाढदिवस असो लग्न असो प्रत्येक कार्यक्रमात ते शाल टोपी न देता वृक्ष भेट देतात ह्याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे, समाजातील सर्व स्तरातून त्यांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात येत आहे.