भगूर/एनजीएन नेटवर्क
भगूर येथे अधिक मासानिमित्त तुळसा लॉन्स येथे माहेश्वरी समाजाच्या वतीने काल भव्य विष्णूपुराण कथा सप्ताहास विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत कथेस मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.कथेच्या पहिल्याच दिवशी सुप्रसिद्ध प्रवचनकार भगूररत्न ह.भ.प गणेश महाराज करंजकर यांच्या वाणीने भाविक मंत्रमुग्ध झाले.
येत्या २५ जुलैपर्यंत आठवडाभर दु.३:३० ते ६:३० वा. पर्यंत हा कथा सोहळा सुरू राहणार आहे. माहेश्वरी समाजाच्या वतीने सकाळी 11.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बालाजी मंदिर येथून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी रथात विष्णुपुराण ग्रंथ, भगवान श्री विष्णूची प्रतिमा व कथाकार भगुररत्न ह भ प गणेश महाराज करंजकर यांची भव्य मिरवणूक शहरातील मेनरोड, करंजकर गल्ली, मुरलीधर मंदिर येथून तुळसा लॉन्स येथे येथे शोभायात्रेचे प्रयाण करण्यात आले. यावेळी माहेश्वरी महिला मंडळाच्या कावेरी केला व समस्त केला परिवाराने श्री विष्णुपुराण ग्रंथ व भगवान विष्णूंच्या प्रतिमेचे व कथाकार हभप गणेश महाराज करंजकर यांचे यथोचित असे स्वागत केले. तदनंतर कथाकार हभप गणेश महाराज करंजकर व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राध्यापक ललित भदे यांनी कथाकार गणेश महाराज करंजकर यांचा उपस्थित अलोट गर्दीच्या भाविकांना परिचय करून दिला. हिंदू धर्मातील प्राचीन अठरा धर्म ग्रंथ पैकी श्री विष्णुपुराण कथा हाही एक प्रमुख धर्मग्रंथ असून 23 हजार श्लोक आधी सृष्टीचा पालन करता रक्षण करता भगवान श्री विष्णूच आहे. भगवान श्री विष्णूंच्या अवताराचे विवेचन,भगवान विष्णू अवतार महिमा, लक्ष्मी व कुबेर कथा, ध्रुव व भक्त प्रल्हाद कथा कृष्णलीला, अधिक मनुष्याचा कर्म सिद्धांत व अधिक मासाचे महत्व विस्तृतपणे सुप्रसिद्ध कीर्तनकार,प्रवचनकार समाज प्रबोधनकार,भगूररत्न ह.भ.प गणेश महाराज करंजकर हे या सात दिवस चालणाऱ्या कथेदरम्यान सांगणार आहे.
यावेळी माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष शशिकांत लोया,सचिव लक्ष्मीनारायण कलंत्री,राजु मुंदडा,रामनाथ झंवर, श्याम चांडक,अशोक लोया, प्रशांत कलंत्री,राहुल भट्टड,द्वारकानाथ झंवर,नंदू शेठ बुब ,राजेंद्र लोया,संतोष लोया,प्रकाश सुराणा ,शैलेश लूनावत,प्रशांत लोया,धीरज बुब,हिरालाल लोया,राजेंद्र फुलफगर,श्याम लाहोटी, निमिश झंवर,राजगोपाल लाहोटी,नुपूर चांडक,प्रिया झंवर,भावना लाहोटी,नयना लाहोटी, निवेदिता भट्टड, पल्लवी धुत,प्राजक्ता मानधने,राखी बुब,श्वेता केला,दीप्ती लाहोटी,मंजू कलंत्री, आदींसह माहेश्वरी समाजाचे समाज बांधव विशेषता महिला व भगूर येथील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.