NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीला हिंसेचे गालबोट; 26 जण ठार..

0

कोलकाता/एनजीएन नेटवर्क

पश्चिम बंगालमध्ये आज पार पडलेल्या मतदानात हिंसाचाराच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारात 26 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजप आणि माकप-डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. राज्यात झालेल्या हिंसाचारासाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप डाव्यांनी आणि भाजपने केला आहे. काही ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्यात,  काही ठिकाणी बॅलेट बॉक्स पळवण्यात आले. काही ठिकाणी मतदारांना पळवले जात आहे. 

पश्चिम बंगालमध्ये पंचायतींच्या  73,887 जागांसाठी मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तैनातीची मागणी करण्यात येत होती. केंद्रीय पोलीस दल तैनात असतानादेखील हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी बॉम्बफेक, हिंसाचार, गोळीबाराच्या घटनांचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही ठिकाणी बॅलेट बॉक्सला आगी लावण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. बळजबरीने मतदान झाल्याचेही वृत्त आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.