NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे काळाच्या पडद्याआड; सात दशके अभिनय..

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

 मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे सोमवारी (दि. १९) निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शांता तांबे यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख निर्माण केली होती. त्यांनी सुरूवातीला नाटकात काम करून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

दिग्गजांसोबत अभिनय

भालजी पेंढारकर, दिनकर पाटील अनंत माने आदी दिग्गज दिग्दर्शकांसोबत शांता तांबे यांनी काम केले. मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका , मोलकरीण, बाई मोठी भाग्याची , मर्दानी अशा अनेक चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने चित्रपटांमध्ये काम करण्याचे ठरवले होते, असे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते. दोन बायका फजिती ऐका, चांडाळ चौकडी, असला नवरा नको गं बाई, सोंगाड्या, चंदनाची चोळी या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले होते.

शांता तांबे यांनी सात दशके त्यांनी अभिनय क्षेत्र गाजवले. त्यानंतर उतरत्या वयामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रातुन ब्रेक घेतला. त्या कोल्हापूरातील त्यांच्या घरी राहत होत्या. त्या अलीकडेच तुझ्यात जीव रंगला या मालिकेत दिसल्या होत्या. या मालिकेत त्यांनी छोटी भूमिका साकारली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.