NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड; वयाच्या ८८ व्या वर्षी..

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

ज्येष्ठ अभिनेते तथा रंगकर्मी जयंत सावरकर यांचे आज निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला उपचार सुरू होते. सावरकर यांनी शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि ३० हून अधिक हिंदी सिनेमांत त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत.

जयंत सावरकर यांच्या निधनानंतर चाहत्यांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत. गेल्या चार दशकांपासून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. जयंत सावरकर हे 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. जयंत सावरकर हे रंगकर्मी असण्यासोबत मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजमध्येही ते झळकले आहेत. 

तळीरामाची भूमिका गाजली

जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६ रोजी गुहागर येथे झाला. वयाच्या विसाव्या वर्षी जयंत सावरकर यांनी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले. त्यांची अनेक नाटके गाजली आहेत. ‘अपराध मीच केला’ (गोळे मास्तर), ‘अपूर्णांक’, ‘अलीबाबा चाळीस चोर’, ‘अल्लादीन जादूचा दिवा’, ‘आम्ही जगतो बेफाम’, ‘एकच प्याला’ अशी अनेक नाटके त्यांची गाजली आहेत. ‘एकच प्याला’ नाटकातील त्यांची तळीरामाची भूमिका चांगलीच गाजली. 

Leave A Reply

Your email address will not be published.