NGN News
Latest Marathi News

‘कहना क्या चाहते हो?’ डायलॉग फेम अभिनेते अच्युत पोतदार कालवश

ठाणे : एनजीएन न्यूज नेटवर्क

ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं निधन झालं आहे. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सैन्यात कॅप्टन पदावरून निवृत्ती घेतलेल्या पोतदार यांनी शिक्षण, भारतीय सैन्य दलात सेवा, इंडियन ऑइल कंपनीतील करिअर आणि अंतिमतः अभिनय या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिलं. ‘थ्री इडियट्स’ मधील त्यांची भूमिका लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली. 

चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करण्यापूर्वी अच्युत पोतदार भारतीय सैन्यात होते आणि नंतर इंडियन ऑइल कंपनीत काम केलं. अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी 1980 च्या दशकात चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये प्रवेश केला. अच्युत पोतदार यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत 125 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. ‘आक्रोश’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘अर्ध सत्य’, ‘तेजाब’, ‘परिंदा’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘दिलवाले’, ‘रंगीला’, ‘वास्तव’, ‘हम साथ रहना’, ‘हम साथ रहना’, ‘भाई’, ‘दबंग 2’ आणि ‘व्हेंटिलेटर’ अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं. आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटात प्रोफेसरची भूमिका साकारून अच्युत पोतदार घराघरात पोहोचले. या सिनेमात ‘क्या बात है’ आणि ‘कहना क्या चाहते हो?’ हे त्यांच्या तोंडचे डायलॉग्स गाजले. 

Comments are closed.