NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

उद्योजक बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा; प्रकल्पांचा पाठपुरावा करणार

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व विकास प्रकल्पांवर उद्योजकांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील प्रस्तावित प्रकल्पांचा पाठपुरावा करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. 

उद्योजकांच्या विविध संघटना एकत्र आल्या असून, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी बैठक घेतली जाते. त्यानुसार निमा हाऊस येथे ही बैठक झाली. त्यात ‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे, ‘आयमा’चे अध्यक्ष निखिल पांचाळ, राष्ट्रीय क्रेडाईचे अनंत राजेगावकर, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा, ‘निपम’चे हेमंत राख, संजय सोनवणे, हितेश पोतदार, मनीष रावल, मिलिंद राजपूत आदी उपस्थित होते. यावेळी गेल्या बैठकीत झालेल्या विषयांचा आढावा घेण्यात आला. तसेच काही विषयांच्या पाठपुराव्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यात वाहतूक व्यवस्था, अतिक्रमणांसंदर्भात प्रादेशिक परिवहन विभाग, महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणे, मनपा आयुक्तांसमवेत अधिकृत थांब्यांबाबत चर्चा करणे, पालकमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन शहर विकासासाठी आवश्यक असलेल्या रिंग रोडबाबत चर्चा करणे, वाहतूक जागृतीसाठी व्हिडीओ तयार करणे, हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा पाठपुरावा करणे, माळेगाव, गोंदे आदी ठिकाणी सिटीलिंक बस सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे, ओझर विमानतळावरील मूलभूत सुविधांबाबत एचएएल व विमानतळ प्राधिकरणासमवेत बैठक घेणे, कायदा व सुव्यवस्थेबाबत पालकमंत्री, गृहमंत्र्यांशी चर्चा करणे आदी बाबी निश्चित करण्यात आल्या. उद्योजक हेमंत पारख यांच्या अपहरण प्रकरणावरून बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. धनंजय बेळे यांनी आयटी पार्क, कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र या प्रस्तावित प्रकल्पांच्या सद्यस्थितीविषयी माहिती दिली. 

Leave A Reply

Your email address will not be published.