NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

भगूरला स्वातंत्र्यदिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा

0

भगूर/दीपक कणसे

७७ वा स्वातंत्र्य दिन शहर व परिसरात विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भगूर शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची शहरातून प्रभात फेरी करण्यात आली यावेळी भारत माता की जय वंदे मातरम आदी घोषणांनी परिसर दणाणून निघाला.

भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक ध्वजारोहण प्रशासकीय अधिकारी श्याम विठ्ठल गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाकरे गट शहरप्रमुख विक्रम सोनवणे,माजी शहर प्रमुख अंबादास कस्तुरे,नगरसेवक दीपक बलकवडे,संजय शिंदे,फरीद शेख,उत्तम आहेर,पोलीस अधिकारी राधाकृष्ण गामणे,प्रताप पवार,रमेश पवार,किशोर खर्डे,नंदू गायकवाड ,दादासाहेब देशमुख,प्रताप गायकवाड,दिनेश आर्य,बाळासाहेब गायकवाड,प्रताप सोनवणे,प्रभाकर आहेर, विठोबा पाटोळे,नगरसेविका स्वाती झुटे, प्रतिभा घुमरे,सर्कल वाबळे,तलाठी धनगर, तुषार कुंडारिया नगरपालिकेचे अधिकारी नम्रता गवळी,चित्रा भवरे,मोहन गायकवाड,शरीफ शेख,चंद्रकांत काळे, शशांक तिवडे,खंडू लकारिया,निळकंठ आवारे आदी सह भगूर शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद शिक्षिका सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्पाधिकारी चित्रा भवरे यांनी केले.

भगूर नागरी सहकारी पतसंस्थेत ध्वजारोहण

येथील भगूर नागरी सहकारी पतसंस्थेत पहिल्यांदाच भक्तीदित्य बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा व पतसंस्थेच्या विद्यमान संचालिका ज्योतीताई करंजकरव  सुनिता आडके यांच्या संकल्पनेतून व भगूर नागरिक सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या छतावर माजी नगराध्यक्ष अनिता ताई करंजकर व माजी सैनिक किरण करंजकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ठाकरे गट शहर प्रमुख विक्रम सोनवणे,माजी शहरप्रमुख अंबादास कस्तुरे,नगरसेवक दीपक बलकवडे,संजय शिंदे,फरीद शेख, उत्तम आहेर,उपशहरप्रमुख नितीन करंजकर,चेअरमन शंकर करंजकर, व्हाईस चेअरमन पांडुरंग आंबेकर, सोसायटी संचालक मंगेश बुरके दत्ता कुवर,संजय जाधव,बाळासाहेब गायकवाड,प्रवीण लकारिया,दिनेश आर्य बाळासाहेब गायकवाड, राजेंद्र फुलफगर, संभाजी देशमुख,उमेश मोहिते,बाळासाहेब कुटे,दत्ता वालझाडे,सुरेश करंजकर शाम ढगे, संचालिका मोहिनी वालझाडे,मेघा करंजकर,सुजाता करंजकर आदी संचालक उपस्थित होते यावेळी भगूर शहरातील विविध अंगणवाडीतील सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या चांगल्या कार्याची बद्दल बेलाचे रोप देऊन अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला तदनंतर बालगोपाल यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोसायटी संचालक दत्ता कुवर यांनी तर आभार मंगेश बुरके यांनी मानले.

शाळांमध्ये उत्साह

भगूर शहरातील शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन उच्च माध्यमिक विद्यालय, ति.झ.विद्यामंदिर भगुर, नुतन प्राथमिक विद्यालय,वासुदेव अथणी विद्यामंदिर,अभिनव बाल विकास मंदिर,उर्दू शाळा, जिल्हा परिषद शाळा,रंगुबाई जुन्नरे विद्यालय, सावरकर स्मारक,नूतन प्राथमिक विद्यालय देवळाली कॅम्प आदी शाळा सह विविध संस्था सामाजिक मंडळे यांच्या वतीने मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री साईबाबा मंदिर जवळील कैलास लकारिया यांच्या वतीने ही ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शिवसेना विभाग प्रमुख प्रवीण लकारिया सह कहार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.