NGN News
Latest Marathi News

वणी पोलिस स्टेशन हद्दीतही ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ नारा

‘लेडी सिंघम’ गायत्री जाधव ॲक्शन मोडमध्ये; भाईगिरी रिल तयार करणाऱ्यांची धिंड

** अमोल भालेराव

वणी : एनजीएन न्यूज नेटवर्क

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सामान्य नागरिक यांची सुरक्षा केंद्रस्थानी ठेऊन नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी गुन्हेगारांन विरुद्ध कठोर भूमिका घेत जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनला आदेश देत,”नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” या घोषणेसह नाशिक ग्रामीण पोलिसांनी कायदा व सुरक्षा या विषयी कठोर भूमिका घेण्याचे आदेश देताच वणी पोलिस ठाण्याच्या एपीआय लेडी सिंघम गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनात, पीएसआय राऊत, वणी बीट हवालदार देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल बच्छाव, गोपनीयचे पोलिस कॉन्स्टेबल चौरे, वणी वाहतूक पोलीस यांनी इंस्टाग्राम भाईगिरी रिल तयार करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या वर टवाळखोरांची शहरातील मुख्य चौकात धिंड काढत चांगलीच अद्दल घडवली.

शहरातून मुख्य परीसरात संशयितांची धिंड काढून जनतेत “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” हा सुरक्षेचा संदेश यावेळी देण्यात आला.वणी पोलीसांच्या या कारवाईचे महिला वर्ग व सामान्य नागरिकांमधून स्वागत होत आहे.व पोलिसांच्या पाठी वणीतील सामान्य जनता खंबीरपणे उभी असल्याचे पोलिसांच्या कारवाई नंतर सोशल मीडियावरील मेसेजेस वरून निदर्शनास येत आले.यावेळी वणी पोलीस स्टेशन सामान्य जनतेच्या हिताची व सुरक्षे

Comments are closed.