– शशिकांत बिरारी
कंधाणे: एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ वंदना मनोहर बिरारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ठरलेल्या आवर्तन पध्दतीने माजी उपसरपंच सौ.संगिता बिरारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर आज ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती सुगंधा पवार होत्या.
निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून कंधाणे ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी सौ बेडसे यांनी काम पाहिले निर्धारित वेळेत वंदना बिरारी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने पिठासन अधिकारी यांनी बिरारी यांच्या निवडीची घोषणा केली.निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांन कडून गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.यावेळी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद बिरारी,माजी उपसभापती संजय बिरारी, अमृता बिरारी, सुरेश बिरारी, राजेंद्र बिरारी, चंद्रकांत बिरारी, हेमंत बिरारी,काकाजी बिरारी, भास्कर बिरारी,बाळू बिरारी,किरण पाटील, मनोहर बिरारी,सदस्य शशिकांत बिरारी,राजेंद्र सोनवणे,माजी सरपंच अनिता भोये, संगिता बिरारी,बेबीबाई भोये, मंगेश बिरारी, भैय्या बिरारी ,व नागरिक उपस्थित होते.निवडीनंतर गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ वंदना बिरारी यांनी वार्तालाप करताना सांगितले.
Comments are closed.