NGN News
Latest Marathi News

वैशाली दाणी, संजीवनी हांडोरे शिवसेना उबाठा पक्षात दाखल

प्रवेशावेळी मोठे शक्तीप्रर्दशन; समर्थकांचा देखील पक्षप्रवेश

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

विहितगाव परिसरातील प्रभाग २२ मधील वैशाली दाणी यांनी शिंदे गटातून तर सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी हांडोरे यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत उपनेते दत्ता गायकवाड यांच्यासह माजी आमदार वसंत गीते, जिल्हाध्यक्ष डी.जी.सुर्यवंशी यांनी केले.

शालिमार येथील पक्ष कार्यालयात प्रवेश सोहळा मंगळवारी झाला. या दोघा महिलांनी प्रवेशावेळी मोठे शक्तीप्रर्दशन केले. त्यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.यात प्रामुख्याने प्रशांत आंरिगळे, बाळासाहेब भालेराव, वंदना बागुल, मुन्ना शेख, लविन जोसेफ, आस्लाम खान, सुभाष हागवणे, संजय हगवणे आदीचा समावेश होता. यावेळी व्यासपिठावर शिवसेना पदाधिकारी केशव पोरजे, याेगेश गाडेकर, बाळासाहेब कोकणी, राहुल दराडे, सुनिल जाधव, ऋषी वर्मा, अरुण महानुभाव,साहेबराव जाधव, राजू मोरे आदी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : गायकवाड

शिवसेनेचे बोट धरून राज्यात वाढलेल्या भाजपाने फोडाफाेडीचे राजकारण करुन पालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र नाशिकसह राज्यातील इतर महापालिकेत शिवसेनेचा (उबाठा) भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. नाशिकमध्ये आमच्याकडे प्रत्येक प्रभागात दहाहून अधिक इच्छुक उमेदवार आहेत. मित्र पक्षांशी आघाडी करायची की नाही? याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार असून त्याची वाट न पाहता प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवार तसेच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,असे आवाहन पक्षाचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी यावेळी केले.

Comments are closed.