NGN News
Latest Marathi News

वाणी समाज प्रबोधन संस्था जायखेडा शाखा अध्यक्षपदी वैशाली ब्राह्मणकर

सटाणा : श्रीकांत रौंदळ

अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था धुळे अंतर्गत सौ. वैशाली किरण ब्राह्मणकर यांची जायखेडा शाखेच्या महिला अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

जायखेडा येथील लाडशाखीय वाणी समाज कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बागलाण तालुकाध्यक्ष माया येवला, कळवण तालुकाध्यक्ष वंदना महाजन , देवळा तालुकाध्यक्ष दर्शना मेतकर, यांचे सह प्रदेश समन्वयक मंगला मेने व नाशिक जिल्हा समन्वयक योगिता शिरो रे, उपस्थित होत्या. जायखेडा शाखेच्या कार्यकारणीत उपाध्यक्ष वंदना ब्राह्मणकर, सचिव वंदना के ब्राह्मणकर, खजिनदार सुचिता ब्राह्मणकर, प्रसिद्धी प्रमुख प्रज्ञा ब्राह्मणकर यांची निवड करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून ज्योती ब्राह्मणकर, आरती महाजन, अंजली ब्राह्मणकर, योगिता महाजन, प्रतिभा ब्राम्हणकर, सविता ब्राह्मणकर, संध्या ब्राह्मणकर, प्रिया ब्राह्मणकर व मार्गदर्शक म्हणून शोभा ब्राह्मणकर यांची निवड करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. बागलान तालुकाध्यक्ष सौ. माया येवला ( मुल्हेर) यांनी सर्वतोपरी सहकार्य करीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Comments are closed.