NGN News
Latest Marathi News

वैद्य निलिमा-विक्रांत जाधव दाम्पत्य संशोधन मोहिमेंतर्गत अंटार्टिकाला रवाना

  • तब्बल 31 दिवस मोहीम सुरु राहणार; ‘मायनस’ सेल्सियस तापमानात करणार संशोधन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

शहरात गेली साडेतीन दशके आयुर्वेदाची चिकित्सा करणारे वैद्य निलिमा-विक्रांत जाधव दाम्पत्य संशोधन मोहिमेंतर्गत अंटार्टिकाला रवाना झाले. ही मोहीम तब्बल 31 दिवस सुरु राहणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.

अंटार्टिकामधीलअतीथंड ऊणे ३२ ते ७९ सेल्सिअस अशा अक्षरशः थिजणाऱ्या तापमानात फुलणाऱ्या वनस्पतींच्या अभ्यास मोहिमे अंतर्गत हे दाम्पत्य रवाना झाले. ह्या मोहिमेत चार देशांचे संशोधक असून ह्यामध्ये संशोधन स्थानकावर भेटी देणार असून मैत्री ह्या भारतीय संशोधन स्थळाला भेट देणार आहेत. त्याच बरोबर साऊथ जोर्जीया , सॅंडविच , रोस आयलंड तसेच स्कॅट, आर्टीजस ह्या बर्फांच्या बेटांवर भेट देणार आहेत

दोन्ही मोहिमाचे लीडर ब्रीटीशचे चॅड बर्ट हे २७ वर्षांचा पोलर ठिकाणांचा अनुभव असलेले आहेत. चॅड यांनी अंटार्टिकामध्ये पहिल्यांदा गेलेल्या शॅकलटनवर लहान चित्रपट ही काढला आहे. ह्या मोहिमेत नाशिककर म्हणून सहभागाची आणि आयुर्वेदावर अभ्यास करण्याची संधी मिळणे, हे भाग्य समजतो असे मत वैद्य विक्रांत जाधवांनी व्यक्त केले . धूतपापेश्वर च्या रणजीत पुराणिकांनी मोहीमीचे यूट्यूब वर प्रती दिनाचे काही क्षण टाकण्याचे ठरविले असून आयुर्वेदाचा सन्मान केल्याची भावना व्यक्त करून नविन आयुर्वेद पिढीला हा वेगळा आदर्श मिळण्यासाठी कामाते ठरेल असे व्यक्त केले .ह्या मोहिमेतील काही महत्वाच्या क्षणांची माहिती देणार असल्याचे मत वैद्य जाधवांनी व्यक्त केलेे

दरम्यान, नाशिकच्या सामाजिक जीवनात सतत सक्रियता नोंदवणाऱ्या जाधव दाम्पत्याच्या या मोहिमेसाठी विविध स्तरांतील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.