नाशिक/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे विठ्ठल आणि पांडुरग असल्याचे म्हणत त्यांना बडव्यांनी घेरल्याचा आरोप पक्ष फुटीनंतर केला जात आहे. मात्र ही वैदिक धर्मसभेला रुचलेला नाही. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांना विठ्ठल, पांडुरंग संबोधल्यास आंदोलन करू असे वैदिक धर्मसभेने म्हटले आहे.
शरद पवार यांना विठ्ठल, पांडुरंग संबोधले तर आम्ही आंदोलन करू. शरद पवार यांना विठ्ठल म्हटल्याने देवतांचा अपमान होतो. त्यामुुळे पवार यांना विठ्ठल, पांडुरंग म्हणणे तात्काळ थांबवा असे वैदिक धर्मसभेने म्हटलं आहे. शरद पवार यांचे आराध्य असलेले फुले, शाहू, आंबेडकर या नावाने त्यांना संबोधले तर आमची काही हरकत नाही असेही वैदिक धर्मसभेने म्हटले आहे. शरद पवार यांना बडव्यांनी घेरल्याच्या वक्तव्यावरही वैदिक धर्मसभेने आक्षेप घेतला आहे. बडव्यांचा उल्लेख करू नये. बडवे हे तेराशे वर्षे पुजारी होते. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख टीका करण्यासाठी करू नये अशी विनंती वैदिक धर्मसभेकडून कऱण्यात आली आहे.