NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

नणंदेच्या गर्भपातासाठी जादूटोण्याचा आधार; महिला, भगत ताब्यात

0

 ठाणे/एनजीएन नेटवर्क

कौटुंबिक वादातून नणंदेचा गर्भपात घडवून आणण्याचा प्रयत्न तिच्याच भावजयीने केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावर न थांबता यासाठी तिने अघोरी पद्धत आवलंबल्याने एकच खळबळ उडाली आहे. नणंदेचा गर्भपात घडवून आणण्यासाठी आरोपी महिलेने जादूटोण्याचा आधार घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मांडवी पोलिस ठाणे हद्दीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपी महिला आणि भगताला ताब्यात घेतले आहे. 

हा धक्कादायक प्रकार विरार जवळच्या मांडवी पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. या प्रकरणी पतीनेच आपल्या पत्नी व भगता विरोधात मांडवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. आरोपी महिलेचे घरात पतीच्या बहिणीसोबत म्हणजेचं नणंदेसोबत कौटुंबिक भांडण सुरू होते. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. त्यातच नणंद गर्भवती असल्याचे समजल्यानंतर वैयक्तिक आकसापोटी तिने भयंकर कट रचला. घराजवळच्या जादूटोणा व अघोरी विद्या करणाऱ्या भगताला नणंदेचा गर्भपात करायला सांगितला व त्यासाठीचे पैसे तिने भगताला ऑनलाइन ट्रान्सफर केले होते. आरोपी पत्नीच्या पतीला हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने तिच्या मोबाईलमधले कॉल रेकॉर्डिंग ऐकले व त्या आधारे मांडवी पोलिसात जाऊन आरोपी पत्नी विरोधात तक्रार दाखल केली आहे. मांडवी पोलिसांनी ही ऑडिओ क्लिप एकूण त्या आधारे आरोपी महिलेवर महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.